State Bank Of India Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI ग्राहकांचे बल्ले-बल्ले, बँक देतेय 40,088 चा फायदा; थेट खात्यात येणार पैसे

SBI ग्राहकांना (SBI Customer) आता 31 मार्चपर्यंत मोठा फायदा मिळणार आहे.

Manish Jadhav

State Bank Of India: स्टेट बँकेत (SBI Account) खाते असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. SBI ग्राहकांना (SBI Customer) आता 31 मार्चपर्यंत मोठा फायदा मिळणार आहे. बँकेने सांगितले आहे की, ग्राहकांना आता 40,088 रुपयांचा फायदा मिळणार आहे. तुम्ही देखील SBI चे ग्राहक असाल तर आम्ही तुम्हाला याचा फायदा कसा घेऊ शकता ते सांगणार आहोत. बँकेने अलीकडेच FD (SBI FD) चे दर वाढवले ​​आहेत.

31 मार्चपर्यंत लाभ घेता येईल

SBI 400 दिवसांच्या FD वर 7.1 टक्के दराचा लाभ देत आहे. यासह, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 25 बेसिस प्वाइंटची वाढ झाली आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला 40,088 रुपयांचा फायदा कसा मिळेल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अतिरिक्त 40,088 रुपये मिळतील

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या विशेष योजनेवरील व्याजदरात (Interest Rate) वाढ केली आहे. तुम्ही 5 लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 5,40,088 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला 40,088 रुपये व्याज मिळतील. हे तुमचे निश्चित उत्पन्न आहे. तुम्ही कोणत्याही शाखेतून हा लाभ घेऊ शकता.

तुम्ही किती काळ फायदा घेऊ शकता

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेचा तुम्ही 31 मार्चपर्यंत लाभ घेऊ शकता. तुम्ही अद्याप या योजनेत गुंतवणूक (Investment) केली नसेल, तर ती संपण्यापूर्वी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करुन त्याचा लाभ घेऊ शकता.

1 वर्षात किती नफा मिळतो?

याशिवाय, जर आपण 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींबद्दल बोललो तर बँकेने यावर 25 बेसिस पॉइंट्स वाढवले ​​आहेत. SBI च्या पहिल्या 1 वर्षाच्या मॅच्युरिटी FD वर 6.75% लाभ मिळत आहे. आता यामध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यानंतर 6.80 टक्के नफा मिळत आहे. त्याचवेळी, पूर्वी 2 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याज मिळत होते आणि आता 7 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे.

3 आणि 5 वर्षात किती नफा मिळतो?

जर आपण 3 वर्षांच्या मुदतीच्या FD बद्दल बोललो तर आधी 6.25 टक्के दराने लाभ मिळत होता, तर आता 6.50 टक्के व्याजाचा लाभ मिळेल. त्याचवेळी, पूर्वीच्या 6.25 टक्क्यांऐवजी आता 5 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 6.50 टक्के व्याज मिळत आहे. बँकेचे नवे दर 15 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT