Sovereign Gold Bond scheme starting from tomorrow  Dainik Gomantak
अर्थविश्व

Sovereign Gold Bond: उद्यापासून करा स्वस्तात सोनं खरेदी

Sovereign Gold Bond योजनेद्वारे सोने खरेदी करताना 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत दिली जाईल

दैनिक गोमन्तक

सरकार जनतेला (Government) स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. Sovereign Gold Bond 2021-22 ची 11वी विक्री सिरीज 10 जानेवारी 2022 पासून सुरू होत आहे. ही योजना फक्त पाच दिवसांसाठी (10 ते 14 जानेवारी) सुरु असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. Sovereign Gold Bond योजना सरकारच्या वतीने आरबीआय (RBI) जारी करते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सरकारी गोल्ड बाँड योजनेच्या 2021-22 च्या नव्या मालिकेसाठी 4,786 रुपये प्रति ग्रॅम किंमत निश्चित केली आहे. सुवर्ण रोखे योजना सोमवारपासून सुरू होणार असून 14 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

ऑनलाइन खरेदीवर 50 रुपये सवलत

हे सोने खरेदी करताना 50 रुपये प्रति ग्रॅम सवलत दिली जाईल, मात्र ही सुट ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना दिली जाईल. अशा गुंतवणूकदारांना ही गोल्ड बाँड योजना 4,736 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने मिळेल.

कुठे खरेदी करू शकतो?

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे सुवर्ण रोखे सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE द्वारे विकले जातील. स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेत सोन्याची विक्री होणार नाही.

गोल्ड बाँड योजना

एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकते. त्याच वेळी, किमान एक ग्रॅम गुंतवणूक असणे आवश्यक आहे. ट्रस्ट किंवा तत्सम संस्थांना हीच मर्यादा 20 किलो ग्रॅमपर्यंत आहे. या योजनेचा लाभ घेण्याासाठी किमान एक ग्रॅम सोन्याच्या रोख्याची खरेदी आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT