FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Small Savings Schemes Rules: PPF-सुकन्या समृद्धीच्या नियमात मोठा बदल, अर्थमंत्र्यांनी जारी केला आदेश

PPF-Sukanya Samriddhi Yojana Update: आता तुम्हीही यापैकी कोणत्याही सरकारी योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पॅन आणि आधारकार्डशिवाय त्याचा लाभ घेऊ शकणार नाही.

Manish Jadhav

Small Savings Schemes Rules: तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सुकन्या समृद्धी योजना (SSY) सारख्या कोणत्याही सरकारी योजनेत पैसे गुंतवले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने नियम बदलले आहेत. आता तुम्हीही यापैकी कोणत्याही सरकारी योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पॅन आणि आधारकार्डशिवाय त्याचा लाभ घेऊ शकणार नाही.

अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली होती

याबाबतची माहिती अर्थ मंत्रालयाने काही काळापूर्वी अधिसूचना जारी करुन दिली होती. या अधिसूचनेत असे सांगण्यात आले होते की, लहान बचत योजनांचा वापर केवायसी म्हणून केला जाईल.

पॅनकार्ड दाखवावे लागेल

याशिवाय, आणखी गुंतवणूक (Investment) करण्यासाठी गुंतवणूकदारांना आधी आधार नोंदणी क्रमांक सादर करावा लागेल, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय, मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड दाखवावे लागेल. तुम्ही पॅनकार्डशिवाय गुंतवणूक करु शकणार नाही.

6 महिने वेळ

पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीमसाठी खाते उघडताना तुमच्याकडे आधार नसल्यास, तुम्हाला आधारसाठी नावनोंदणी स्लिपचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच, गुंतवणूकदाराला (Investors) 'स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम' च्या गुंतवणुकीशी जोडण्यासाठी खाते उघडल्यापासून सहा महिन्यांच्या आत आधार क्रमांक द्यावा लागेल.

आतापासून तुम्हाला स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये खाते उघडण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल-

>> तुमच्याकडे आधार क्रमांक किंवा घर नावनोंदणी स्लिप असणे आवश्यक आहे.

>> याशिवाय पासपोर्ट आकाराचा फोटो असावा.

>> पॅन क्रमांक, विद्यमान गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर न केल्यास त्यांचे खाते 1 ऑक्टोबर 2023 पासून बंद केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT