Share Market on high investors earn 2.50 lakhs cr in half an hour
Share Market on high investors earn 2.50 lakhs cr in half an hour  Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Market तेजीतच, अवघ्या अर्ध्या तासात गुंतवणूकदारांची 2.50 लाख कोटींची कमाई

दैनिक गोमन्तक

गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात जागतिक बाजारपेठेतून येणाऱ्या सकारात्मक संकेतामुळे चांगली झालेली पाहायला मिळत आहे. साप्ताहिक फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) च्या समाप्तीच्या दिवशी, सेन्सेक्स (Sensex) 430.85 अंकांच्या वाढीसह 59,358.18 वर सुरू झाला असून दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 124.2 अंकांनी वाढून 17,670.85 ने सुरू झाला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 532 अंकांनी वाढून 59,459 च्या पातळीवर पोहोचला. ट्रेडिंग दरम्यान, बाजारात काही कंपन्यांचे शेअर्स अधिकच वाढताना दिसत आहेत ज्यामध्ये अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व, एसबीआय, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल), एचडीएफसी बँक, इन्फोसिस या कंपनींचा समावेश आहे. (Share Market on high investors earn 2.50 lakhs cr in half an hour)

साप्ताहिक एफ अँड ओ संपण्याच्या दिवशीच बाजारात तेजी दिसून येत आहे. हेवीवेट शेअर्स बरोबरच मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही चांगली खरेदी दिसून येत आहे. बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.18 टक्क्यावर व्यापार करत आहे, तर बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.29 टक्क्यांनी वाढला आहे.

गुंतवणूकदारांचा 2.50 लाख कोटींपेक्षा जास्त नफा

आज गुंतवणूकदारांनी बाजारात विक्रमी वेगाने कमाई केली आहे. अवघ्या अर्ध्या तासाच्या व्यवसायामध्ये त्यांची संपत्ती 2.50 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढली आहे. बुधवारी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 2,58,56,596.22 कोटी रुपये होते, जे 2,57,877.21 कोटी रुपयांनी वाढून आज 2,61,14,473.43 कोटी रुपये झाले आहे.

बँकिंग, मेटल, रिअल्टी स्टॉकमध्ये मोठी खरेदी

आजच्या व्यवसायात रिअल्टी, बँकिंग, मेटलसह सर्व क्षेत्रांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. रिअल्टी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे निफ्टी रिअल्टी इंडेक्स 5.28 टक्क्यांपर्यंत गेला आहे.या व्यतिरिक्त, निफ्टी बँक निर्देशांक 1.39 टक्के, निफ्टी मेटल निर्देशांक 1.33 टक्के, निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 1.97 टक्के वाढला आहे.

Data Patterns आणणार 700 कोटींचा आयपीओ

संरक्षण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या डेटा पॅटर्न (इंडिया) या कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. 600-700 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. डेटा पॅटर्नच्या पब्लिक इश्यू अंतर्गत, 300 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील तर विद्यमान प्रवर्तक आणि भागधारक ऑफर फॉर सेल अंतर्गत 60,70,675 इक्विटी शेअर्स विकतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT