Fixed Deposit: तुम्हाला गुंतवणूक करायची असेल आणि जोखीम घ्यायची नसेल, तर त्यासाठी मुदत ठेव (FD) हा एक चांगला पर्याय आहे. FD वर ठराविक वेळेत निश्चित व्याज मिळू शकते. कोणती बँक FD वर किती व्याज देत आहे, ते जाणून घेऊया...
Fixed Deposit Calculator
आपल्या कमाईतून बचत करणे फार महत्वाचे आहे, कारण ही बचत भविष्यातील चांगल्या आणि वाईट काळात उपयोगी पडते. त्याचबरोबर तुमची बचतही वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवली जाऊ शकते, जेणेकरुन तुम्हाला त्यावर चांगला परतावा मिळू शकेल. तुम्हाला गुंतवणूक (Investment) करायची असेल आणि जोखीम घ्यायची नसेल, तर त्यासाठी मुदत ठेव (FD) हा एक चांगला पर्याय आहे. FD वर ठराविक वेळेत निश्चित व्याज मिळू शकते.
अलीकडेच, काही बँकांनी त्यांचा FD व्याजदर (फिक्स्ड डिपॉझिट इंटरेस्ट रेट) बदलला आहे. तथापि, आम्ही इथे त्या बँकांच्या एफडीबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीच्या व्याजदरात बदल केला आहे.
RBL बँक- RBL बँक ज्येष्ठ नागरिकांना 725 दिवसांच्या FD वर 7.75% व्याज देत आहे.
Bank Of India
बँक ऑफ इंडिया (Bank Of India) 1 नोव्हेंबर 2022 पासून ज्येष्ठ नागरिकांना 777 दिवसांच्या ठेवींवर 7.75% व्याज देत आहे.
Federal Bank
फेडरल बँक 10 ऑक्टोबर 2022 पासून ज्येष्ठ नागरिकांना 750 दिवसांच्या ठेवींवर 7% व्याज देत आहे.
Yes Bank
येस बँक ज्येष्ठ नागरिकांना 36 महिने ते 10 वर्षांच्या ठेवींवर 7.5% व्याज देत आहे. बँक 1.5 ते 3 वर्षांच्या ठेवींवर 7.25% व्याज देते. हा दर 3 नोव्हेंबर 2022 पासून लागू होईल.
IDFC First Bank
IDFC फर्स्ट बँक ज्येष्ठ नागरिकांना 750 दिवसांच्या FD वर 7.75% व्याज देत आहे. बँक 501 दिवस ते 749 दिवसांच्या ठेवींवर 7.25% व्याज देते. हा दर 10 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.