SBI  Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI Share Price: SBI ने दिली आनंदाची बातमी, कमाईच्या बाबतीत 'चांदी'!

SBI Bank Account: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मोठी बातमी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

SBI Share Price: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मोठी बातमी दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आता सप्टेंबरच्या तिमाहीत चांगला नफा कमावला आहे. देशातील सर्वात मोठी बँक SBI ने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत स्टँडअलोन आधारावर 13,265 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 74 टक्के जास्त आहे.

दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले की, 'बुडीत कर्जासाठी आर्थिक तरतूद कमी केल्या आहेत. त्याचबरोबर व्याज उत्पन्नात वाढ झाल्यामुळे नफा वाढला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत बँकेचा स्वतंत्र आधारावर नफा 7,627 कोटी रुपये होता.'

निव्वळ व्याज उत्पन्न

बँकेचे एकूण उत्पन्नही समीक्षाधीन तिमाहीत रु. 88,734 कोटी इतके वाढले आहे, जे मागील वर्षीच्या तिमाहीत रु. 77,689.09 कोटी होते. एसबीआयचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) मागील तिमाहीत 13 टक्क्यांनी वाढून 35,183 कोटी रुपये झाले आहे, जे एका वर्षापूर्वी 31,184 कोटी रुपये होते.

NPA

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ताही सुधारली आहे. त्याची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत 4.90 टक्क्यांवरुन एकूण प्रगतीच्या 3.52 टक्क्यांवर घसरली. निव्वळ एनपीए किंवा बुडित कर्जाचे प्रमाणही एकूण ऍडव्हान्सच्या 0.80 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. हे प्रमाण वर्षभरापूर्वी याच काळात 1.52 टक्के होते. यामुळे बुडीत कर्जासाठी आर्थिक तरतूद करण्याची गरज कमी झाली आहे.

वर्षभरापूर्वी, बँकेला बुडीत कर्जासाठी 2,699 कोटी रुपयांची तरतूद करायची होती, परंतु सप्टेंबर तिमाहीत ही रक्कम 2,011 कोटी रुपयांवर आली. बँकेचा निव्वळ नफा 66 टक्क्यांनी वाढून 14,752 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत 8,890 कोटी रुपये होता. SBI समुहाचे एकूण उत्पन्नही समीक्षाधीन तिमाहीत रु. 1,14,782 कोटी इतके वाढले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत रु. 1,01,143.26 कोटी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT