SBI has advised customers not to scan code to get money otherwise money will be deducted Dainik Gomantak
अर्थविश्व

SBIचा ग्राहकांना इशारा; पैसे मिळवण्यासाठी QR कोड स्कॅन करू नका नाहीतर...

देशात डिजिटायझेशनमुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे.

दैनिक गोमन्तक

देशात डिजिटायझेशनमुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत फसवणुकीच्या सर्वाधिक घटना ह्या मोबाईलच्या क्यूआर कोडमुळेच झाल्या आहेत. आजकाल फसवणूक करणारे, लोकांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या युक्ती लढवत पैसे काढत आहेत. क्यूआर कोड फसवणुकीचे वाढते प्रकरण लक्षात घेता, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) 44 कोटींहून अधिक ग्राहकांना सतर्क करत म्हटले आहे की, जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडून क्यूआर कोड मिळाला तर तो चुकूनही स्कॅन करू नका, असे केल्याने तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. (SBI has advised customers not to scan code to get money otherwise money will be deducted)

एसबीआयने ट्विट करत ग्राहकांना सतर्क केले आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही, प्रत्येक वेळी तुम्ही UPI पेमेंट करता तेव्हा तुम्हाला सेफ्टी टिप्स लक्षात ठेवावे लागतील.

QR Code म्हणजे काय?

आम्ही तुम्हाला सांगतो की क्यूआर कोडमध्ये काही एनक्रिप्टेड माहिती असते. त्यात फोन नंबर असू शकतो, वेबसाइटची लिंक असू शकते, अ‍ॅपची डाउनलोड लिंक देखील असू शकते. ही माहिती डिक्रिप्ट करण्यासाठी तुम्हाला ती स्कॅन करावी लागते. तुम्ही तो कोड स्कॅन करताच, तुमच्यासमोर साध्या मजकुराच्या स्वरूपात उघडतो.

QR Code फसवणूक कशी होते?

SBI ने सांगितले की QR कोड पेमेंट करण्यासाठी वापरला जातो पेमेंट प्राप्त करण्यासाठी नाही. म्हणून, पेमेंट प्राप्त करण्याच्या नावाखाली तुम्ही कधीही QR कोड स्कॅन करू नका. आणि यामुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते. SBI नुसार, तुम्ही QR कोड स्कॅन करता तेव्हा तुम्हाला पैसे मिळत नाहीत, फक्त बँक खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज तुमच्या मोबाईल वरती येतो.

या सुरक्षा टिपांचे अनुसरण करा.

SBI ने सांगितले आहे की, कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी आधी UPI आयडीची पडताळणी करा. UPI पेमेंट करताना काही सुरक्षा नियम पाळले पाहिजेत असे बँकेने म्हटले.

UPI पिन फक्त मनी ट्रान्सफरसाठी वापरला जातो, पैसे प्राप्त करण्यासाठी नाही.

पैसे पाठवण्यापूर्वी नेहमी मोबाईल नंबर, नाव आणि UPI आयडी वेरिफाई करा.

UPI पिन कोणाशीही शेअर करू नका.

फंड ट्रांसफरसाठी स्कॅनरचा योग्य वापर करा.

अधिकृत स्रोतांव्यतिरिक्त इतरांकडून उपाय घेऊ नका.

कोणत्याही पेमेंट किंवा तांत्रिक समस्यांसाठी अ‍ॅपच्या मदत घ्या आणि कोणत्याही विसंगतीच्या बाबतीत बँकेच्या तक्रार निवारण पोर्टल https://crcf.sbi.co.in/ccf/ द्वारे निराकरण करुन घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT