SBI Dainik Gomantak
अर्थविश्व

Fact Check: पॅन नंबर अपडेट न केल्यास SBI खाते ब्लॉक होईल का?

Cyber Alert: आजकाल अनेक सायबर गुन्हेगार पॅन नंबर, आधार क्रमांक असल्याच्या नावाने लोकांना मॅसेज पाठवतात.

दैनिक गोमन्तक

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) करोडो खातेदारांसाठी कामाची बातमी आहे. जर तुमचे खाते या बॅंकेत असेल तर असेल तर तुम्हाला पॅन नंबर अपडेट करण्याबाबत अनेक प्रकारचे मॅसेज येत असतील तर वेळीच सावध व्हा. अशा कॉल, व्हॉट्सअॅप आणि मेल लिंकवर क्लिक करून तुमची माहिती पाठवून तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. गेल्या काही वर्षांत भारतात (India) डिजिटलायझेशन खूप वेगाने वाढले आहे. यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे.

आजकाल अनेक सायबर गुन्हेगार (Cyber Alert) पॅन क्रमांक (Pan Card), आधार क्रमांक (KYC Update) अपडेट करण्याच्या नावाखाली लोकांना संदेश पाठवतात. यानंतर, ग्राहकांची वैयक्तिक माहिती शेअर केल्यानंतर ते खात्यातून लाखो रुपये काढतात. अशा परिस्थितीत अशा फेक मॅसेजपासून स्वतःला सुरक्षित ठेवा. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) स्टेट बँकेशी संबंधित एक मॅसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मॅसेजमध्ये लोकांना पॅनशी संबंधित माहिती अपडेट करण्यास सांगितले जात आहे.

  • पीआयबीने लोकांना सतर्क केले आहे

सरकारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या व्हायरल मॅसेजची सत्यता तपासली आहे. या तथ्य तपासणीमध्ये, पीआयबीने (PIB) सांगितले आहे की एसबीआयच्या अनेक ग्राहकांना पॅन क्रमांक अपडेट करण्यासाठी संदेश पाठवला जात आहे. या मॅसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, जर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ही माहिती अपडेट केली नाही तर तुमचे अकाउंट ब्लॉक केले जाईल. या संदेशाबाबत पीआयबीने म्हटले आहे की, तो पूर्णपणे बनावट आहे. बँक (Bank) कोणत्याही ग्राहकाला कॉल, मॅसेज किंवा ईमेलद्वारे माहिती अपडेट करण्यास सांगत नाही.

  • तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका

PIB फॅक्ट चेकने लोकांना सांगितले की, चुकूनही त्यांची वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करू नका. अनेक वेळा सायबर गुन्हेगार तुम्हाला एक फॉर्म भरण्यास सांगतात ज्यामध्ये तुमचे वैयक्तिक माहिती जसे की नाव, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, खाते तपशील आणि क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील विचारले जातात. अशा प्रकारची माहिती अजिबात शेअर करू नका. तुम्हाला असा कोणताही मॅसेज मिळाल्यास, रिपोर्ट.phishing@sbi.co.in वर मेलद्वारे तुमची तक्रार ताबडतोब नोंदवा. याशिवाय सायबर क्राईमसाठी 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करूनही तुम्ही संपर्क साधू शकता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Water Crisis: गोव्यातील 'या' भागावर घोंघावतेय पाणीसंकट! जलवाहिनी गळतीमुळे वाढला धोका; हजारो लिटर पाणी वाया

VIDEO: गोव्यात रशियन कुटुंबाकडून बेकायदेशीर 'टॅक्सी व्यवसाय'; यांना कोणाचा 'आशीर्वाद'? स्थानिकांचा सवाल

Mormugao Port: मोठी बातमी! मुरगाव बंदरात कंटेनर व्यवसाय सुरू, SCI जहाज दाखल; ‘एमपीए’बरोबरच राज्यालाही होणार लाभ

Konkani Drama Competition: 'हा कोकणी लेखकांचा अनादर, नाट्य चळवळीला मारक'; राज्यनाट्य स्पर्धा आणि वादांचे साद-पडसाद

Horoscope: धन, यश आणि प्रगती! नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 3 राशींसाठी महायोग, वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT