Saudi Arabia, the world's largest oil producer, has reduced the premium charged on India's oil exports. Dainik Gomantak
अर्थविश्व

Saudi Arabia: भारताच्या एका खेळीने सौदी नमला; कच्चा तेलाबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Saudi Arabia: ओपेक, ज्यामध्ये मध्य पूर्वेतील सर्व प्रमुख तेल-उत्पादक देशांचा समावेश आहे, त्यांनी 2022 मध्ये भारताला सुमारे 75 % तेल निर्यात केले होते.

Ashutosh Masgaunde

Saudi Arabia, the world's largest oil producer, has reduced the premium charged on India's oil exports: जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश सौदी अरेबियाने, भारताचा तेल निर्यातीवर आकारला जाणारा प्रीमियम कमी केला आहे, तर इतर अनेकांनी तो पूर्णपणे बंद केला आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, भारताने मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल आयातीला सुरुवात केल्यानंतर सौदी अरेबियाने नरमाईची भूमिका घेतली आहे.

भारताचा दबाव

आशियाई प्रीमियम ही आशियाई देशांकडून पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशांची संघटना (ओपेक) द्वारे आकारली जाणारी अतिरिक्त रक्कम आहे. जी वास्तविक विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे.

हा प्रिमियम काढून टाकण्यासाठी भारताने तेल उत्पादकांवर वारंवार दबाव आणला होता. तसेच यामध्ये सूटही मागितली होती.

त्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवल्याने सौदी अरेबियाने मागील वर्षाच्या तुलनेत हा प्रीमियम 10 डॉलर्सवरून आता 3.5 डॉलर्स प्रति बॅरल केला आहे, असे संबंधीत व्यक्तीने सांगितले.

"काही पुरवठादार सवलत देत आहेत, काही प्रीमियम आकारत आहेत. पण तुम्ही त्यांच्याकडून कमी प्रमाणात खरेदी करत आहात. सध्या, ओपेक आशियाई देशांकडून अतिरिक्त शुल्क आकारत आहेत. सध्या प्रीमियम प्रति बॅरल 3.5 डॉलर आहे. सौदी OSP (तेल विक्री किंमत) वर प्रीमियम आकारत आहे. युनायटेड अरब अमिराती मात्र शुल्क आकारत नाही,” असे त्या व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

"आयात आधीच कमी झाली आहे. सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्र त्यांना स्वस्त मिळेल तिथून तेल विकत घेतील," असे ती व्यक्ती पुढे म्हणाली.

सौदी अरेबिया, यूएई आणि इराकला घरघर

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दुसरे आणि तिसरे सर्वात मोठे आयातदार चीन आणि भारत या प्रमुख आशियाई खरेदीदारांनी रशियातून कच्च्या तेलाच्या आयातीला चालना दिली.

युक्रेनमधील युद्धानंतर रशियाने तेल खरेदीमध्ये सवलत देऊ केली. 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत, रशियातून तेलाची आयात 12.36 अब्ज डॉलर्स इतकी होती, जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 171% जास्त होती.

सौदी अरेबिया तिसऱ्या क्रमांकावर घसरला कारण तेल निर्यात 24% घसरून 5.49 अब्ज डॉलर्स इतकी झाली. दुसरीकडे यूएई ची तेल निर्यात 63% घसरून 1.71 अब्ज डॉलर्स झाली.

इराक 6.55 अब्ज डॉलर मूल्याच्या दृष्टीने दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार होता. त्यांनी मोठी सवलतही देऊ केली होती. तरीही त्यांची निर्यात 38% नी घटली आहे.

2022 ओपेक कडून 75 टक्के तेल आयात

जुलैमध्ये, S&P ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सच्या अहवालात म्हटले आहे की, 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत रशिया आणि मध्य पूर्व देशांना प्रत्येकी 40-45% टक्के तेल निर्यातीचा वाटा मिळेल.

ओपेक, ज्यामध्ये मध्य पूर्वेतील सर्व प्रमुख तेल-उत्पादक देशांचा समावेश आहे, त्यांनी 2022 मध्ये भारताला सुमारे 75 % तेल निर्यात केले होते. मात्र यानंतर भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT