अर्थविश्व

SAR Group Electric Vehicle : SAR ग्रुपची इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये एन्ट्री

गोमन्तक डिजिटल टीम

जगभरात पेट्रोल, डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमती आणि पर्यावरणाचा धोका विचारात घेऊन लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बॅटरी क्षेत्रातील दिग्गज असणारे SAR ग्रुपही (SAR Group) आता ई-मोबिलिटी क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. SAR ग्रुपने इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) क्षेत्रात 1,500 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

देशातील इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी पाहता, गेल्या काही काळात Hero, Ola, Ather Energy Okinawa या कंपन्यांनी बाजारात वाहने लाँच केली आहेत. त्याच वेळी, अनेक कंपन्या विकसित मॉडेल लॉन्च करत आहेत. या कंपन्यांना टफ फाईट देण्यासाठी बॅटरी आणि ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज SAR ही कंपनी देखील टू-व्हीलर मार्केटमध्ये उतरली आहे.

LivGuard बॅटरी आणि Livpure वॉटर प्रोडक्ट्सच्या निर्मात्या SAR ने इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि ई-बाईक मार्केटमध्ये 15,000 कोटी रुपये गुंतवणूकीची घोषणा केली आहे. कंपनीचा हरियाणातील मानेसर प्लांट इलेक्ट्रिक वाहनांसाठी उभारण्यात आला होता.

सार ग्रुपचे संस्थापक राकेश मल्होत्रा ​​म्हणाले, मानेसर प्लांटमध्ये वार्षिक 150,000 युनिट्स तयार करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. अलीकडेच सार ग्रुपने इलेक्ट्रिक स्कूटर Lectrix EV स्कूटर लॉन्च केली आहे. समूहाने यापूर्वी इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि आता 15,000 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक जाहीर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT