येस बँक-DHFL फसवणूक प्रकरणामध्ये मोठी कारवाई करत, ईडीने संजय छाब्रिया आणि अविनाश भोसले यांची मालमत्ता जप्त केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने संजय छाब्रिया यांची 251 कोटी रुपये आणि अविनाश भोसले यांची 164 कोटी रुपये एकूण 415 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली तसेच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (PMLA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी रेडियस डेव्हलपर्सचे संजय छाब्रिया आणि एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चरचे अविनाश भोसले यांना याआधी अटक करण्यात आली होती. (Sanjay Chhabria and Avinash Bhosale's property worth Rs 415 crore has been seized by ED)
संजय छाब्रिया यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथील 116.5 कोटी रुपयांच्या जमिनीचा समावेश आहे तर याशिवाय सांताक्रूझ येथे असलेला 3 कोटी रुपयांचा फ्लॅट, दिल्ली विमानतळावर असलेल्या छाब्रियाच्या हॉटेलमधून 13.67 कोटी रुपयांचा नफा आणि 3.10 कोटी रुपयांच्या तीन लक्झरी कारचाही यामध्ये समावेश आहे. त्याचवेळी अविनाश भोसले यांच्याकडे मुंबईत 102.8 कोटी रुपयांचा डुप्लेक्स फ्लॅट देखील आहे. याशिवाय पुण्यातील 14.65 आणि 29.24 कोटी रुपयांची जमीन, नागपुरातील 15.52 कोटी रुपयांची आणि 1.45 कोटी रुपयांची आणखी एक जमीन ईडीने जप्त केली आहे.
सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने येस बँकेचे राणा कपूर आणि डीएचएफएलचे कपिल वाधवन आणि धीरज वाधवन प्रवर्तकांच्या विरोधामध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे. राणा कपूरने M/s DHFL चे प्रवर्तक संचालक कपिल वाधवन आणि इतरांसोबत M/s DHFL ला येस बँक लिमिटेडद्वारे आर्थिक सहाय्य देण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा देखील आरोप आहे यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात आला आहे.
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे 2011 एव्हिएशनने AW109AP हेलिकॉप्टर 36 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे तसेच वर्वा आशियाई व्यक्ती असोसिएशनच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.