samsung galaxy f23 Dainik Gomantak
अर्थविश्व

सॅमसंग गॅलक्सि एफ 8 मार्चला होणार लॉन्च, 'हे' आहेत फीचर्स

हा फोन फक्त फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार

दैनिक गोमन्तक

सॅमसंग 8 मार्च रोजी भारतात नवीन सॅमसंग एफ-सिरीज स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा नवीन फोन सॅमसंग गॅलक्सि एफ 23 5G असू शकतो. लॉन्च होण्यापूर्वीच सॅमसंग गॅलक्सि एफ 23 5G बद्दल काही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फोनसाठी फ्लिपकार्टवर (Flipkart) एक मायक्रो साइटही लाईव्ह करण्यात आली आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की हा फोन फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध करून दिला जाईल.

सॅमसंग गॅलक्सि एफ23 5G कसा असेल:

या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसह बेझल-लेस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनला आयताकृती कॅमेरा असेल. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन दोन रंगात लॉन्च केला जाऊ शकतो.

सॅमसंग (Samsung) गॅलक्सि एफ 23 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. Adreno 619 GPU सह फोनमध्ये 8mm क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G चिपसेट दिला जाऊ शकतो. म्हणजेच हा फोन 5G सक्षम असेल. 5G बँडची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

सॅमसंग गॅलक्सि एफ 23 5G FHD+ पॅनेल आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनरसह ऑफर केले जाऊ शकते. हा फोनमध्ये 8MP आणि 2MP थर्ड सेन्सर असेल. फोनमध्ये 50MP चा प्राइमरी सेन्सर देखील दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 3.5mm ऑडिओ पोर्ट असण्याचीही शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT