Spicejet
Spicejet Dainik Gomantak
अर्थविश्व

Salary Hike: स्पाइसजेटने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली बंपर वाढ, मिळणार दुप्पट पगार

दैनिक गोमन्तक

Salary Hike News: दिवाळीपूर्वी स्पाइसजेटने आपल्या वैमानिकांना मोठी भेट दिली आहे. स्पाइसजेटने वैमानिकांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वैमानिकांच्या पगाराच्या रचनेत बदल करताना, विमान कंपनीने त्यांचे मासिक पगार दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. खरेतर, स्पाइसजेटने 80 तासांच्या उड्डाणासाठी आपल्या कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन सुमारे 55 टक्क्यांनी वाढवून 7 लाख रुपये केले आहे. ही पगारवाढ 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

स्पाइसजेटने एक मोठी घोषणा केली आहे

स्पाइसजेटने (Spicejet) दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या पगारातही 'प्रमाणानुसार' वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी, स्पाइसजेटच्या कर्मचार्‍यांनी (Employees) दावा केला होता की, जुलै महिन्यासाठी फ्लाइट क्रूसह कर्मचार्‍यांच्या पगाराचे वितरण करण्यात विलंब झाला होता. दुसरीकडे, अनेकांना 2021-22 या आर्थिक वर्षासाठी फॉर्म 16 अद्याप मिळालेला नाही.

पगार पूर्वी वाढला

स्पाइसजेट वैमानिकांच्या मूळ वेतनात सातत्याने वाढ करत आहे. याआधी, सप्टेंबरच्या पगारात प्रशिक्षकांसाठी 10 टक्के आणि कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर्ससाठी 8 टक्के वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर्सच्या पगारात ऑक्टोबरपासून 22 टक्के वाढ करण्यात आली आहे.

खरे तर, एअरलाइनला सरकारकडून (Government) कर्ज हमी योजनेअंतर्गत निधीचा पहिला हप्ता मिळाला आहे, त्यानंतर त्यांनी आपल्या वैमानिकांच्या एका वर्गाच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीनंतर स्पाइसजेटमधील कॅप्टनचा पगार त्याच्या कोविडपूर्व पगारापेक्षा जास्त असेल.

दुसरीकडे, एअरलाइन्सच्या सूत्रांनी 2 सप्टेंबर रोजी सांगितले होते की, सरकारच्या आपत्कालीन क्रेडिट सुविधा हमी योजनेअंतर्गत (ECLGS) एअरलाइनला सुमारे 225 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT