August 1 Rule Changes Dainik Gomantak
अर्थविश्व

August 1 Rule Changes: 1 ऑगस्टपासून लागू झाले 5 मोठे बदल, एलपीजी, रेल्वे बुकिंग आणि बँकिंगच्या नियमांमुळे खिशावर थेट परिणाम; जाणून घ्या

Rules Changing From 1st August 2026: आज, म्हणजेच 1 ऑगस्ट 2026 पासून देशात पर्सनल फायनान्स, रेल्वे आणि एलपीजी गॅस सिलिंडरशी संबंधित महत्त्वाचे नियम बदलले आहेत.

Manish Jadhav

Rules Changing From 1st August 2026: आज, म्हणजेच 1 ऑगस्ट 2026 पासून देशात पर्सनल फायनान्स, रेल्वे आणि एलपीजी गॅस सिलिंडरशी संबंधित महत्त्वाचे नियम बदलले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांचे मासिक बजेट आणि दैनंदिन व्यवहारांवर होणार आहे. 1 ऑगस्टच्या सकाळीच तेल कंपन्यांनी कमर्शियल (19 किलो) एलपीजी सिलिंडरच्या दरात 202 रुपयांची कपात करुन मोठा दिलासा दिला. यामुळे हॉटेल चालकांना मोठा फायदा होणार आहे. मात्र त्याचवेळी, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून त्याचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि रांगा कमी करण्यासाठी तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत महत्त्वपूर्ण सुधारणा केली. 1 ऑगस्टपासून रेल्वे आरक्षण काउंटरवर टोकन-आधारित नवीन यंत्रणा लागू करण्यात आली. या नवीन व्यवस्थेमुळे प्रवाशांना आता टोकन घेण्यासाठी आणि तिकीट बुक करण्यासाठी दोनदा लांबलचक रांगेत उभे राहावे लागणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि त्रास वाचणार आहे.

तसेच, बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रात आजपासून 'सेंट्रल केवायसी 2.0' ची अपग्रेटेड सिस्टीम लागू झाली. या नवीन सुविधेमुळे ग्राहकांना बँक खाते उघडणे, म्युच्युअल फंड किंवा विमा पॉलिसी घेण्यासाठी वारंवार वेगवेगळे केवायसी कागदपत्रे जमा करण्याच्या कटकटीपासून कायमची मुक्ती मिळणार आहे. एकाच केंद्रीय डेटाबेसवरुन ही सर्व प्रक्रिया सुलभ होईल.

दुसरीकडे, देशातील अनेक प्रमुख बँकांनी आजपासून क्रेडिट कार्डच्या रिव्हॉर्ड पॉइंट्स, लाउंज ॲक्सेस, लेट पेमेंट चार्जेस आणि प्रोसेसिंग फीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी सुधारित नियम तपासूनच व्यवहार करणे फायदेशीर ठरेल.

दरम्यान, आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयटीआर (ITR) भरण्याची 31 जुलैची अंतिम मुदत संपली आहे. 1 ऑगस्टपासून आता बिलेटेड रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या स्लॅबनुसार लेट फी (दंड) आणि थकीत करावर व्याज द्यावे लागणार आहे. त्यामुळे मुदतीत आयटीआर न भरलेल्या करदात्यांच्या खिशाला अतिरिक्त फटका बसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT