रॉयल एनफील्डचा विचार करताच आपल्या डोळ्यासमोर दमदार फीचर्स, पॉवरफुल इंजिन आणि क्लासिक लूक येतो. बऱ्याच काळापासून क्लासिक 350 आणि बुलेट हे रॉयल एनफील्डचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहेत, परंतु आता चित्र बदलत आहे. रॉयल एनफील्डची नवीन बाईक "हंटर 350" ने बाजारात खळबळ उडवून दिली आहे. 1.50 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च झालेली हंटर 350 ग्राहकांना इतकी पसंत पडत आहे की, तिने क्लासिक आणि बुलेट सारख्या बाईक्सच्या विक्रीला मागे सोडले.
दरम्यान, हंटर 350 चे डिझाइन तरुण पिढीला लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. बाईकचा स्टायलिश लूक, कॉम्पॅक्ट बॉडी आणि आधुनिक फीचर्स तरुणांना मोहिनी घालत आहेत. ही शानदार बाईक रायडिंगसाठी बेस्ट असून तिचे हलके वजन आणि उत्कृष्ट हॅंडलिंगमुळे ती ट्रॅफिकमध्येही आरामदायी बनते.
हंटरने एप्रिलमध्ये 18,109 युनिट्स विकल्या, जे मार्चमध्ये विकल्या गेलेल्या 16,958 युनिट्सपेक्षा 6.7 टक्के जास्त आहे. याशिवाय, एप्रिल 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 16,186 युनिट्सपेक्षा 11.8 टक्के जास्त आहे. दुसरीकडे, रॉयल एनफील्डने (Royal Enfield) मे 2025 मध्ये 89,429 बाईक विकल्या, जे एप्रिल 2025 मध्ये विकल्या गेलेल्या 86,559 युनिट्सपेक्षा 3.3 टक्के वाढ दर्शवते. क्लासिक आणि बुलेट त्यांच्या विंटेज लूकसाठी ओळखल्या जातात तर हंटरमध्ये आधुनिक ट्विस्ट दिसून येतो. हंटर तरुण रायडर्ससाठी एक परिपूर्ण पॅकेज असल्याचे सिद्ध होत आहे.
हंटर 350 मध्ये 349 सीसी जे-सिरीज इंजिन देण्यात आले असून ते नवीन फ्रेम आणि गिअरिंगसह ट्यून करण्यात आले आहे. तसेच, हंटरचे क्लासिकपेक्षा वजन कमी आहे, जे पिकअप आणि मायलेजसाठी फायदेशीर ठरते. बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स, डिजिटल-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि ड्युअल चॅनेल एबीएस सारखे दमदार फीचर्स देखील आहेत, जे आजच्या रायडर्सच्या गरजा पूर्ण करतात. रिपोर्टनुसार, हंटर 350 ची मागणी वाढत आहे. खासकरुन मागील काही महिन्यांपासून क्लासिक आणि बुलेटपेक्षा जास्त युनिट्स विकल्या गेल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.