Royal Enfield Hunter 350 Dainik Gomantak
अर्थविश्व

Royal Enfield Hunter 350: रॉयल एनफील्ड हंटर 350 लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

गोमन्तक डिजिटल टीम

बुलेट म्हणजे प्रत्येक बाईक प्रेमीचे स्वप्न, त्यात रॉयल एनफील्डने अनेक वर्षे बुलेट विश्वात अधिराज्य गाजवले आहे. रॉयल एनफील्डचे आज (रविवारी) "हंटर 350" (Royal Enfield Hunter 350) हे नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. नवीन लुक, फिचर्स आणि बजेटमधील किंमत अशी काही खास वैशिष्ट्ये आहेत हंटर 350 बाईकची. कंपनीने थायलंडमध्ये (Thailand) नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात हंटर 350 चे अनावरण केले. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.

पॉवरफुल इंजिन

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, रॉयल एनफील्डच्या Meteor 350 आणि नवीन Classic 350 बाईकमध्ये येणारे इंजिनच हंटर 350 मध्ये असू शकते. 349 cc सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड असे हे इंजिन आहे. इंजिनची 20.2 Bhp ची कमाल शक्ती असून, 27 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. बाइकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आहे.

Royal Enfield Hunter 350

किंमत किती आहे?

हंटर 350 बाईकची अपेक्षित किंमत 1.7 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल. बाईकमध्ये स्विचगियरच्या आत USB चार्जिंग सॉकेट मिळेल.

Royal Enfield Hunter 350

रॉयल एनफील्ड हंटर 350 बाईक निर्मितीवर आणि डिझाईनवर 2016 पासून काम सुरू होते. बाईकला दमदार लुक आणि स्टाईश करण्यासाठी कंपनीची सर्व टिम काम करत होती. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा समाप्त झाली असून, नवी कोरी हंटर 350 बाईक प्रेमींच्या भेटीला आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT