FM Nirmala Sitharaman  Dainik DainikGomantak
अर्थविश्व

500 Rupees Note: 500 रुपयांची नोट बंद होणार का? अर्थ मंत्रालयाने दिली मोठी अपडेट

Currency News Update: मोदी सरकारने वेळोवेळी अनेक मोठे निर्णय घेतले आहे. अलीकडेच, सरकारने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला.

Manish Jadhav

Currency News Update: मोदी सरकारने वेळोवेळी अनेक मोठे निर्णय घेतले आहे. अलीकडेच, सरकारने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. आता अर्थ मंत्रालयाने लोकसभेत चलनी नोटांबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे.

सरकार आता 500 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेत आहे का...? अर्थ मंत्रालयाने लोकसभेत 500, 1000, 2000 रुपयांच्या नोटांबाबत मोठी अपडेट दिली आहे.

30 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे

रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्ही 2000 रुपयांची नोट बदलू शकता.

अर्थ मंत्रालयाने लोकसभेत सांगितले की, बँकांमध्ये (Bank) 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे आणि सरकार ती आणखी वाढवण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाही.

पाचशेच्या नोटेवरही बंदी येणार का?

ब्लॅक मनीला आळा घालण्यासाठी सरकार 500 रुपयांची नोट बंद करणार का?, असा प्रश्न मीडियाने अर्थ मंत्रालयाला विचारला आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकार मोठ्या नोटा बंद करत आहे.

सध्या बाजारात 500 रुपयांची नोट सर्वात मोठी आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत 500 रुपयांच्या नोटेवरही बंदी घालणार आहात का? त्यावर, अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले की, सध्या अशा कोणत्याही योजनेचा विचार करण्यात आलेला नाही.

2016 मध्ये पहिल्यांदाच नोटबंदी झाली

दुसरीकडे, 2016 मध्ये पहिल्यांदाच मोदी सरकारने (Government) नोटाबंदीसारखा मोठा निर्णय घेतला, ज्यामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या. नोटबंदीच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

आता अलीकडेच सरकारने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर सरकार पुन्हा एकदा 1000 रुपयांची नोट परत आणू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरही अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, सध्या अशा कोणत्याही योजनेचा विचार करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT