RBI Governor Shaktikanta Das
RBI Governor Shaktikanta Das Dainik Gomant
अर्थविश्व

RBI MPC Meeting: RBI रेपो दर वाढवण्याच्या तयारीत, EMI महाग होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

RBI MPC Meeting: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर करतील. असे मानले जात आहे की आजच्या पतधोरणात देशाची मध्यवर्ती बँक आरबीआय सलग तिसऱ्यांदा रेपो दरासह इतर धोरणात्मक दर वाढवण्याची शक्यता आहे. सध्या देशात रेपो दर 4.90 टक्के आहे आणि तो 0.50 टक्क्यांनी वाढवून 5.40 टक्क्यांवर आणला जाऊ शकतो. म्हणजेच हा दर पुन्हा ऑगस्ट 2019 च्या पातळीवर पोहोचेल.

आरबीआयच्या एमपीसी बैठकीच्या निर्णयांवर काय अंदाज आहे

आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत कोणते निर्णय होतील, हे आज सकाळी 10 नंतर कळेल, मात्र आरबीआयने दर वाढवल्यास याचा परिणाम गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाची EMIवर होणार हे स्पष्ट आहे.

मागील सलग पतधोरणात आरबीआयने दर वाढवले आहेत.आधी मे महिन्यात आरबीआयने रेपो दरात 0.40 टक्के आणि जूनमध्ये 0.50 टक्के वाढ केली होती. यानंतर रेपो दर सध्या 4.90 टक्के आहे. आज जर त्याचे दर 0.35 टक्के किंवा 0.50 टक्क्यांनी वाढले तर ते 5 टक्क्यांच्या पुढे जाईल.

महागाई उच्च पातळीवर राहिली असून, सलग सहा महिने चलनविषयक धोरण समितीच्या निश्चित पातळीच्या वर येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे . याशिवाय, अलीकडेच यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक या पतधोरणात 0.40-0.50 टक्क्यांनी धोरणात्मक दर वाढवू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT