Renault Upcoming SUV Dainik Gomantak
अर्थविश्व

Renault Upcoming SUV: नव्या अवतारात लवकरच लॉन्च होणार 'ही' परवडणारी रेनॉल्ट एसयूव्ही; नेक्सॉन, व्हेन्यू अन् ब्रेझाचे मोडणार कंबरडे!

5-Seater Compact SUV India: रेनॉल्ट इंडिया लवकरच त्यांच्या ट्रायबर आणि किगर वाहनांचा मिड-लाइफ फेसलिफ्ट आणणार आहे. या दोन्ही वाहनांच्या लाँचिंगपासून त्यांच्या डिझाइनमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही.

Manish Jadhav

रेनॉल्ट इंडिया लवकरच त्यांच्या ट्रायबर आणि किगर वाहनांचा मिड-लाइफ फेसलिफ्ट आणणार आहे. या दोन्ही वाहनांच्या लाँचिंगपासून त्यांच्या डिझाइनमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. अलीकडेच, नवीन किगरची चाचणी घेतल्याचे काही स्पाय शॉट्स मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले. यामध्ये नवीन किगरबद्दल काही माहिती समोर आली. ही 5-सीटर सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतीय बाजारात टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई व्हेन्यूशी स्पर्धा करते.

दरम्यान, किगर ही एक एसयूव्ही आहे, जी या सेगमेंटमध्ये येते. तिच्या सेगमेंटमध्ये ती अधिक चांगल्या प्रकारे सादर करता यावी म्हणून तिचे फेसलिफ्टिंग केले जात आहे. स्पाय फोटोंवरुन असे दिसून येते की, नवीन किगरमध्ये मागील बाजूस चौकोनी आकाराचे एलईडी टेल लाइट्स आहेत. किगरमध्ये आता एक मोठे फ्रंट ग्रिल आहे, जे सध्याच्या मॉडेलमध्ये नाही. या ग्रिलच्या वर एक लहान ग्रिल देखील असू शकते, ज्यावर "RENAULT" लिहिलेले असू शकते. बोनेट लाइन सरळ असून रेनॉल्टचा लोगो बसवण्यासाठी वेगळा कट नाही. एलईडी डीआरएलची रचना थोडी पातळ आणि आकर्षक असू शकते, परंतु त्याचा मूळ आकार जवळजवळ सारखाच राहील.

हेडलाइट्स आणि फॉग लाईट्स

हेडलाइट्सचा सेटअप जवळजवळ सध्याच्या मॉडेलसारखाच दिसतो. म्हणजेच, तीन लहान एलईडी प्रोजेक्टर जे हॉरिजॉन्टली बसवले आहेत. पहिल्यांदाच, रेनॉल्ट किगरमध्ये फॉग लाईट्स देऊ शकते. अशी अपेक्षा आहे की, कारमध्ये (Car) कॉर्नरिंग फंक्शन देखील असेल, जसे की पूर्वीच्या कॅप्चर मॉडेलमध्ये होते. सी-आकाराचे एलईडी टेल लाईट्स पूर्वीसारखेच राहतील. 2026 किगरमध्ये तेच इंजिन मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच 1.0 लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन. एनए आणि टर्बो दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड मॅन्युअल, 5-स्पीड एएमटी आणि सीव्हीटी गिअरबॉक्ससारखे पर्याय दिले जाऊ शकतात.

सेफ्टी फीचर्स

सध्याच्या रेनॉल्ट काइगरमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यात प्रगत सुरक्षा प्रणाली, मोठे केबिन आणि विविध कनेक्टिव्हिटी पर्यायांचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, किगर 20.5 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते. त्यात एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, ईएसपी, एअरबॅग्ज आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स सारख्या 17 सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT