Reliance Retail in traditional wear launch new brand Avantra  Dainik Gomantak
अर्थविश्व

Reliance Retailची पोशाख क्षेत्रात उडी,'अवंत्र' नावाचा आणला ब्रँड

रिलायन्स रिटेल (Reliance Retail) 'अवंत्र ' (Avantra) या ब्रँड नावाने स्टोअरची एक चेन सुरू करणार आहे.

दैनिक गोमन्तक

टाटा समूहाच्या (Tata Group) तनिष्क (Tanishq) आणि आदित्य बिर्ला (Aditya Birla Fashion) फॅशन रिटेलला पोशाख आणि साडीच्या क्षेत्रात टक्कर देण्यासाठी आता रिलायन्स रिटेल ((Reliance Retail) सज्ज जाळे आहे. रिलायन्स रिटेल 'अवंत्र ' (Avantra) या ब्रँड नावाने स्टोअरची एक चेन सुरू करणार आहे.(Reliance Retail in traditional wear launch new brand Avantra)

सण आणि लग्नाचा हंगाम सुरू असताना मार्केटमध्ये होणार विकास देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल. तसेच ग्राहकांची रेलचेल मध्यम आकाराच्या स्टोअरमध्ये दिसेल, असे या विकासाशी परिचित असलेल्या तीन लोकांनी सांगितले. टीओआयने पाठवलेल्या प्रश्नावलीला रिलायन्स रिटेलच्या प्रवक्त्याने आणखीन तरी प्रतिसाद दिला नाही.

रिलायन्स कंपनीचे हे पाऊल तनिष्कच्या पार्श्वभूमीवर आले आहे, यापूर्वी तनिष्क प्रामुख्याने ज्वेलरी ब्रँड होता मात्र तनिष्क आता पारंपरिक पोशाख क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्याचबरोबर आदित्य बिर्ला यांच्या एबीएफआरएलने कंपनीनेही, सब्यसाची आणि तरुण ताहिलियानी सारख्या घरगुती डिझायनर वेअर लेबल्समध्ये लक्षणीय भाग घेवून या क्षेत्रात मोठी उडी घेतली आहे.

सध्या जगात जागतिक परिधान ब्रँड्सची मोठी मागणी असूनही,पारंपरिक पोशाख हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे, ज्यामुळे अनेक देशी आणि विदेशी ब्रँड पाश्चिमात्य पोशाखात तज्ज्ञ आहेत मात्र त्यांनी आता देसी कपड्यांचे संग्रह सुरू केले आहेत.

रिलाइन्स साड्या आणि पारंपरिक पोशाखांमध्ये आपला ब्रँड विकण्याव्यतिरिक्त अवंत्र हा ब्रँड रिजनल व्हेवर क्लस्टर तसेच Nalli स्किल्स या सारख्या कंपनीमध्ये देखील आपली भागीदारी ठेवणार आहे.त्याचबरोबर "दागिने, अॅक्सेसरीज आणि टेलरिंग सेवा देखील या ऑफरचा भाग असणार आहे ," असे एका सूत्राने सांगितले आहे .अवंत्र आपले पहिले स्टोअर बेंगळुरूमध्ये, त्यानंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात इतर स्टोअर सुरू करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT