Reliance Jio Dainik Gomantak
अर्थविश्व

जिओने दिला मोठा झटका! या प्लॅनसाठी यूजर्संना द्यावे लागणार अधिक पैसे

भारतातील (India) आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या यूजर्संना मोठा धक्का दिला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या यूजर्संना मोठा झटका दिला आहे. रिलायन्स जिओचा 11 महिने चालणारा प्लान आता 899 रुपयांचा झाला आहे. यापूर्वी या प्लॅनसाठी यूजर्संना 749 रुपये मोजावे लागत होते. हा जिओ फोन प्लान आहे. यापूर्वी कंपनी या प्लॅनवर 150 रुपयांची सूट देत होती, जी आता रद्द करण्यात आली आहे. (Reliance Jio Has Raised Its Jiophone Tariffs By 20 Per Cent)

899 रुपयांच्या प्लॅनमध्ये फायदे उपलब्ध आहेत

कंपनीचा हा प्लान 336 (28 दिवस x 12 सायकल) च्या वैधतेसह येतो. इंटरनेट (Internet) वापरण्यासाठी कंपनी या प्लॅनमध्ये दर 28 दिवसांसाठी 2GB डेटा देत आहे. त्यानुसार, प्लॅनमध्ये उपलब्ध एकूण डेटा 24 GB होईल. देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 50 एसएमएस/ 28 दिवस मोफत मिळतात. कंपनी प्लॅनच्या सदस्यांना Jio अ‍ॅप्सचा मोफत प्रवेश देखील देत आहे.

जिओ फोनचा सर्वात स्वस्त प्लॅन

Jio फोनचा सर्वात स्वस्त प्लॅन 75 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 23 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज 0.1 GB मिळेल. कंपनी या प्लानमध्ये 200MB अतिरिक्त डेटा देखील देत आहे. अमर्यादित कॉलिंग बेनिफिटसह येणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला 50 फ्री एसएमएस देखील मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT