redmi 10 launched in india with 50mp dual camera price under 10 thousand know features Dainik Gomantak
अर्थविश्व

रेडमीची खास ऑफर, 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन 11,000 हजारात

रेडमी 10 या तीन कलरमध्ये लॉन्च

दैनिक गोमन्तक

रेडमीने आज भारतात रेडमी10 लॉन्च केला आहे. नवीन रेडमी स्मार्टफोनची (smartphone) खासियत म्हणजे त्यात असलेला स्नॅपड्रॅगन 680 आणि 50MP कॅमेरा.

रेडमी 10 किंमत आणि ऑफर

रेडमी 10 च्या 4GB/64GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. जे खरेदीदार एचडीएफसी क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय द्वारे फोन खरेदी करतात त्यांना 1000 रुपयांची सूट मिळेल. redmi 10 Mi.com, Flipkart.com, आणि एमआय स्टुडिओ (Studio) स्टोअर्सवर 24 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. रेडमी चा हा फोन कॅरिबियन ग्रीन, पॅसिफिक ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक या कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

रेडमी 10 चे स्पेसिफिकेशन्स

रेडमी 10 मध्ये 6.71-इंचाचा HD डिस्प्ले आहे. रेडमीने सांगितले आहे की डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास दिले जात आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC सह LPDDR4x रॅम आणि UFS 2.2 स्टोरेजमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. हे अँड्रॉइड (Android) 11 वर आधारित MIUI 13 बूट करते. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी, हँडसेटच्या मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा आहे ज्यामध्ये 50MP प्राथमिक आणि 2MP सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ (video) कॉलसाठी समोर 5MP कॅमेरा आहे.

रेडमी 10 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन ड्युअल सिम कार्ड स्लॉट, 4G कनेक्टिव्हिटी, ड्युअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0 आणि GNSS सह येतो. इतर वैशिष्ट्यांमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, 3.5 मिमी हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले जाणारआहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT