Supertech Dainik Gomantak
अर्थविश्व

रिअल इस्टेट कंपनी सुपरटेकला मोठा झटका, NCLT ने केले दिवाळखोरी जाहीर

दिल्ली-एनसीआरमध्ये या कंपनीचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या दिल्ली खंडपीठाने युनियन बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे.

दैनिक गोमन्तक

रिअल इस्टेट (Real Estate) कंपनी असणाऱ्या सुपरटेकला मोठा झटका बसला आहे. NCLT म्हणजेच राष्ट्रीय कायदा कंपनी न्यायाधिकरणाने सुपरटेकला दिवाळखोर घोषित केले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi) या कंपनीचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या दिल्ली खंडपीठाने युनियन बँक ऑफ इंडियाच्या (Union Bank of India) याचिकेवर हा निर्णय दिला आहे. (Real estate company Supertech has been declared bankrupt by the National Law Company Tribunal)

दरम्यान, थकबाकी न भरण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. एनसीएलटीच्या या निर्णयामुळे सुमारे 25 हजार घर खरेदीदारांना फटका बसू शकतो. NCLT च्या या आदेशामुळे 25,000 पेक्षा जास्त गृहखरेदीदार प्रभावित होऊ शकतात जे अनेक वर्षांपासून विकासकाकडे बुक केलेल्या त्यांच्या घरांची वाट पाहत आहेत. दुसरीकडे, सुपरटेकने एक प्रेस रिलीझ जारी करुन म्हटले आहे की, या निर्णयाविरोधात ते NCLAT मध्ये अपील करणार आहेत. रिलीझ जारी करुन म्हटले आहे की, या निर्णयाविरोधात आम्ही NCLAT मध्ये अपील करणार आहोत. या आदेशाचा सुपरनोव्हा, ORB, गोल्फ कंट्री, HUES, Azaila, Esquire, Valley, Basera, Metropolis mall, Pentagon mall, Hotels वर परिणाम होणार नाही, असेही सुपरटेकच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT