Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

Saving Account Interest Rate: सेव्हिंग अकाउंट असणाऱ्यांना लागली लॉटरी, 'या' बँकेच्या ग्राहकांना आजपासून मिळणार अधिक लाभ!

RBL Bank Interest Rates: बँकेकडून नवीन व्याजदर आजपासून म्हणजेच 21 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात आला आहे.

Manish Jadhav

RBL Bank New Rule: आरबीएल बँकेने आपल्या ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, RBL बँक (RBL Bank) ने निवडक रकमेवर NRE/NRO बचतींसह बचत खात्यांवरील व्याजदरात 50 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत वाढ केली आहे.

बँकेकडून नवीन व्याजदर आजपासून म्हणजेच 21 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात आला आहे.

RBL बँक बचत खात्यावरील व्याजदर

दरम्यान, 1 लाख रुपयांपर्यंतच्या दैनंदिन शिल्लक असलेल्या बचत खात्यावर बँकेकडून 4.25% दर दिला जाईल. तर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 10 लाखांपर्यंतच्या बचत खात्यावर 5.50% व्याजदर (Interest Rate) बँकेतून दिला जाईल.

याशिवाय 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर बँकेकडून 6.00% व्याज दिले जाईल.

व्याजदरात 50 बेसिस पॉईंटने वाढ करण्यात आली आहे

बँकेने (Bank) 25 लाखांपेक्षा जास्त दैनंदिन शिल्लक असलेल्या खात्यांवरील व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. RBL च्या वतीने रु. 25 लाख ते रु. 3 कोटी दरम्यानच्या रकमेवर व्याजदर 7% वरुन 7.50% करण्यात आला आहे.

याशिवाय, बँकेने दररोज जास्त शिल्लक असलेल्या खात्यांवरील व्याजदर कमी केला आहे. 3 कोटींवरील रकमेवर व्याजदर 50 बेस पॉईंटने कमी करण्यात आला आहे. म्हणजेच 3 कोटी ते 25 कोटींपर्यंतच्या रकमेवर आता 7% ऐवजी 6.5% दराने व्याज दिले जाईल.

दुसरीकडे, 25 कोटी ते 50 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवर RBL बँक 6.25% व्याज देत आहे. याशिवाय, 50 कोटी ते 100 कोटींपर्यंतच्या रकमेवर 6.00% दराने व्याज दिले जाईल. 100 कोटी ते 200 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवर 4 टक्के दराने व्याज दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT