Reserve Bank of India Dainik Gomantak
अर्थविश्व

होम लोन घेणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! बँकेच्या 'या' चुकीवर तुम्हाला दररोज मिळतील एवढे हजार

Reserve Bank of India: तुम्ही देखील कोणत्याही बँक किंवा NBFC कडून गृहकर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. घ

Manish Jadhav

Reserve Bank of India: तुम्ही देखील कोणत्याही बँक किंवा NBFC कडून गृहकर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी कर्ज घेणे सामान्य आहे.

मात्र कर्जाची परतफेड केल्यानंतर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना मालमत्तेची कागदपत्रे परत मिळवण्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागल्या.

नुकतेच बँकेतून मालमत्तेची कागदपत्रे हरवल्याची घटनाही समोर आली आहे. अशीच प्रकरणे समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने नवा आदेश जारी केला आहे.

बँका आणि NBFC साठी नवीन नियम जारी केले आहेत

RBI ने बँका आणि NBFC साठी नवीन नियम जारी केले आहेत. कर्जाची पूर्ण परतफेड केल्याच्या 30 दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे रिलीज करावीत, असे सेंट्रल बँकेच्या आदेशात म्हटले आहे. या कालावधीनंतर बँक किंवा NBFC द्वारे दस्तऐवज जारी केल्यास, बँकेला दंड भरावा लागेल.

दररोज 5,000 रुपये दंड

नवीन नियम 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहे. बँक (Bank) किंवा एनबीएफसीकडून कागदपत्रे देण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन 5 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे आदेशात सांगण्यात आले. दंडाची रक्कम संबंधित मालमत्ताधारकाला भरावी लागेल.

आरबीआयने असेही म्हटले होते की, जर कर्जदाराच्या मालमत्तेची कागदपत्रे हरवली तर बँकेने ग्राहकाला कागदपत्रांच्या डुप्लिकेट प्रती मिळवण्यासाठी मदत करावी लागेल. कर्जाची परतफेड केल्यानंतर जंगम मालमत्तेची कागदपत्रे बँकेने परत करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT