RBI Repo Rate Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Repo Rate Hike: होम लोन, कार लोन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 'इतक्या' टक्क्यांची वाढ; 4 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

RBI MPC Rate Result Repo Rate Hiked: भारतीय रिझर्व बँकेने तब्बल चार वर्षांनंतर महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात मोठी वाढ केली.

Manish Jadhav

RBI MPC Rate Result Repo Rate Hiked: भारतीय रिझर्व बँकेने तब्बल चार वर्षांनंतर महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात मोठी वाढ केली. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे रेपो रेट 5.25 टक्क्यांवरुन वाढून 5.50 टक्के झाला. फेब्रुवारी 2023 नंतर पहिल्यांदाच व्याजदरांमध्ये ही वाढ करण्यात आली. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती देताना स्पष्ट केले की, कच्च्या मालाच्या आणि ऊर्जेच्या वाढत्या किंमतींमुळे वाढणाऱ्या कोर इन्फ्लेशनला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

रेपो रेट म्हणजे तो दर ज्यावर देशाची मध्यवर्ती बँक देशातील इतर व्यावसायिक बँकांना जसे की एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांना कर्ज पुरवठा करते. जेव्हा रेपो रेट वाढतो, तेव्हा बँकांना मिळणारे कर्ज महाग होते आणि साहजिकच बँक आपल्या ग्राहकांसाठी कर्जाचे व्याजदर वाढवतात. यामुळे सर्वसामान्यांचे होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन महागणार असून, त्यांचा दरमहा भरला जाणारा ईएमआय वाढेल अथवा कर्जाचा कालावधी लांबणीवर जाईल. फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतलेल्या ग्राहकांना याचा तातडीने सामना करावा लागेल, तर नवीन कर्ज घेणाऱ्यांनाही आता अधिक व्याज मोजावे लागेल.

दुसरीकडे, या बदलाचा एक सकारात्मक फायदा म्हणजे येत्या काळात बँका फिक्स्ड डिपॉझिट आणि बचतीवरील व्याजदर वाढवू शकतात, ज्यामुळे ठेवीदारांना चांगला परतावा मिळू शकेल. बाजारातील पैशांचा प्रवाह नियंत्रित करुन महागाई आटोक्यात आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला असून, एमपीसीने आपल्या धोरणात्मक भूमिकेत बदल करत ते 'कॅलिब्रेटेड टाईटनिंग'च्या मार्गावर नेले आहे. महागाईला (Inflation) लगाम लावण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी काळात सर्वसामान्यांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त; वीजटंचाईवर उद्योगांचा सामायिक खर्चवाटपाचा प्रस्ताव

Narendra Modi Journey: 7 ऑक्टोबर 2001 ते मोदी पर्वाची 25 वर्षे; गुजरातपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास, विकासाच्या दाव्यांपासून रोजगार-लोकशाहीवरील प्रश्नांपर्यंत

DA Hike: सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, पगारात झाली घसघशीत वाढ; 'या' सरकारनं दिलं मोठं गिफ्ट

October Heat: 34 अंश तापमान, पण अंगाला जाणवतोय 43 अंशांचा चटका! गोव्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याची तीव्रता वाढली

SIR Voter List Case: 'सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे' म्हणत ECIची स्थगितीची मागणी; गोवा खंडपीठाचा नकार, 'दोन्ही प्रकरणांतील कायदेशीर मुद्दे वेगळे'

SCROLL FOR NEXT