RBI Bank News | Penalty on 3 Co-operative Banks  Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Penalty On Banks: या तीन सहकारी बँकांना RBI ने ठोठावला दंड!

भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे.

दैनिक गोमन्तक

RBI Penalty on 3 Co-operative Banks: भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे. या बँकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याने मध्यवर्ती बँकेने ही कारवाई केली आहे. आरबीआयने ज्या बँकांवर कारवाई केली त्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई आणि नॅशनल सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., बेतिया आणि महाराष्ट्राची सहकारी बँक नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक यांचा समावेश आहे. (RBI News)

या कारणावरुन नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई

नियमांचे पालन न केल्यामुळे RBI ने नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेवर ही मोठी कारवाई केली आहे. बँकेला एकूण 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या कारणास्तव इतर बँकांवर कारवाई केली

त्याच बरोबर नॅशनल सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (National Central Cooperative Bank Limited), बेतिया आणि नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Nasik Merchant's Co-operative Bank Ltd) वेगवेगळ्या कारणांमुळे आरबीआयने कारवाई केली आहे. नाशिक मर्चंट्स सहकारी बँकेवर इतर बँकांतील ठेवी आणि व्याजाचा तपशील दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचवेळी केवायसीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी बेतियाच्या सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. या बँकेला आरबीआयने 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होईल

आरबीआयच्या (RBI) या कारवाईचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. या बँकांच्या (Banks) नियामक अनुपालनावर रिझर्व्ह बँकेने दंड ठोठावला आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही या बँकांचे ग्राहक असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT