RBI Monetary Policy Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Monetary Policy: RBI ने केली व्याजदरात पुन्हा वाढ, जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी

RBI Governor Shaktikanta Das: आरबीआयने रेपो दरात 50 बीपीएसने वाढ केली असून त्यामुळे रेपो दर आता 5.90 टक्के इतका झाला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास द्वि-मासिक चलनविषयक धोरणाची घोषणा करताना, म्हणाले की महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. भारत देखील यापासून दूर राहिला नाही. चलनवाढीचा दर अजूनही RBI ने सेट केलेल्या कम्फर्ट झोन 2-6 टक्क्यांच्या वर आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आरबीआयच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने घेतलेले निर्णय शक्तिकांत दास यांनी जाहीर केले. चला, जाणून घेऊया चलनविषयक धोरणाविषयी 10 मोठ्या गोष्टी.

आरबीआयने रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ केली असून, तो 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्क्यांवर आणला आहे. आतापर्यंतच्या 5 महिन्यांत रेपो रेट 1.90 टक्क्यांनी वाढला आहे.

जगभरातील वाढती महागाई पाहता आर्थिक मंदीची भीती वाढत असली तरी भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे. RBI ने आर्थिक वर्ष 2023 साठी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) महागाईचा अंदाज 6.7 टक्के राखून ठेवला आहे.

आर्थिक वर्ष 2023 साठी वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज 7.2 टक्क्यांवरून 7 टक्के करण्यात आला आहे.

रुपयाच्या अवमूल्यनावर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, या वर्षी 28 सप्टेंबरपर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया 7.4 टक्क्यांनी घसरला आहे.

RBI ने रुपयासाठी कोणताही विशिष्ट विनिमय दर निश्चित केलेला नाही. रुपयाच्या उच्च अस्थिरतेच्या प्रसंगी आरबीआय हस्तक्षेप करते आणि मध्यवर्ती बँकेच्या परकीय चलनाचा साठा मजबूत करते.

ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे ऑफलाइन पेमेंट एग्रीगेटर्ससाठी देखील उपलब्ध असतील.

एप्रिल ते जुलै या कालावधीत थेट परकीय गुंतवणूक $18.9 अब्ज होती, जी मागील वर्षी याच कालावधीत $13.1 अब्ज होती.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, बँक कर्ज 16.2 टक्के वेगाने वाढले आहे.

दास म्हणाले की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत नुकतीच झालेली नरमाई कायम राहिल्यास महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळू शकतो.

ग्रामीण भागातील मागणी हळूहळू वाढत आहे, गुंतवणुकीची मागणीही वाढत आहे आणि कृषी क्षेत्रही स्थिर आहे.

मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) आणि बँक रेट 5.65 टक्क्यांवरून 6.15 टक्के करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT