Shaktikanta Das Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Governor: इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगल्या स्थितीत- शक्तिकांत दास

गंभीर जागतिक परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था तुलनेने चांगल्या स्थितीत आहे.

दैनिक गोमन्तक

RBI Governor Shaktikanta Das: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गंभीर आव्हाने असूनही भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे सांगितले आहे. आज BOB वार्षिक बँकिंग परिषदेला संबोधित करताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, गंभीर जागतिक परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था तुलनेने चांगल्या स्थितीत आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, 'भारतीय रुपया इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे . रुपयामध्ये तीव्र चढउतार आणि अस्थिरता येऊ दिली जाणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाजारात यूएस डॉलरचा पुरवठा करत आहे त्यामुळे रोखीचा पुरेसा पुरवठा (तरलता) सुनिश्चित होतो. आरबीआयच्या पावलांमुळे रुपयाचा व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे.' याशिवाय असुरक्षित परकीय चलनाच्या व्यवहारांबद्दल घाबरण्याऐवजी त्याकडे वस्तुस्थिती पाहण्याची गरज आहे, असा सल्लाही दास यांनी दिला आहे.

देशातील महागाईवर RBI गव्हर्नरची भूमिका

रेपो दराबाबत शक्तिकांत दास काय म्हणाले, आरबीआय गव्हर्नर यांनी रेपो रेटवरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, तरलता आणि दर वाढविण्याबाबत निर्णय घेताना आरबीआय नेहमीच विकासाचे लक्ष्य लक्षात ठेवते आणि त्यानुसार आरबीआयचे चलनविषयक धोरणाबोबत RBIची धोरण समिती आवश्यक ती पावलं उचलते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT