RBI Governor Shaktikanta Das declared repo rate today  Dainik Gomantak
अर्थविश्व

महागाई वाढणार तर डिजिटल पेमेंटही महागणार

शक्तिकांता दास म्हणाले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत चर्चा पेपर जारी करेल.

दैनिक गोमन्तक

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI Governor ) शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी बुधवारी चलनविषयक धोरण समितीचे (MPC) चौथे द्विमासिक धोरण सादर केले आहे. यांनतर बोलताना शक्तीकांत दास यांनी व्याजदर स्थिर ठेवण्याची घोषणा केली तर पो दर 4 टक्के, रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे यासोबतच एमपीसीने आपली अनुकूल भूमिका कायम ठेवली आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये (वर्ष 2020) आरबीआयने रेपो दरात 0.75 टक्के आणि मेमध्ये 0.40 टक्के कपात केली होती. या कपातीनंतर रेपो दर 4 टक्क्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर आला होता.(RBI Governor Shaktikanta Das declared repo rate today)

देशाची प्रगती सामान्य गतीने

ते म्हणाले की, सध्या देशाच्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेला कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराचा धोका आहे. तथापि, आपला देश कोविड-19 सारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर महागाई नियंत्रित करण्यासाठी मजबूत बफर स्टॉकही उपलब्ध असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. आरबीआयने वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज 9.5 टक्के राखून ठेवला आहे. याचा सरळ अर्थ असा की देशाची प्रगती अतिशय सामान्य गतीने सुरू राहील तथापि, मध्यवर्ती बँकेने आर्थिक वर्ष 2022 च्या तिसर्‍या तिमाहीसाठी GDP वाढीचा अंदाज 6.8 टक्क्यांवरून कमी करून 6.6 टक्के केला आहे.

डिजिटल पेमेंट होणार महाग

शक्तिकांता दास म्हणाले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत चर्चा पेपर जारी करेल. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, आगामी काळात डिजिटल पेमेंट करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. ते म्हणाले की RBI UPI आधारित फीचर फोन उत्पादने लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी

केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क आणि व्हॅटमध्ये कपात केल्याने मागणी वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रयशक्तीही वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याची आरबीआयनेही दखल घेतली असल्याचे देखील शक्तिकांता दास यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT