Governor Shaktikant Das Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Governor Shaktikant Das on Economy: 'वाढत्या महागाईपासून मिळणार दिलासा, अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार'; RBI गव्हर्नरांचा विश्वास

RBI गव्हर्नरांनी देशाची आर्थिक वाढ आणि महागाई संदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे. या बातमीने सर्वसामान्यांना लवकरच महागाईपासून दिलासा मिळू शकेल.

Manish Jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. याचदरम्यान, RBI गव्हर्नरांनी देशाची आर्थिक वाढ आणि महागाई संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे. या बातमीने सर्वसामान्यांना लवकरच महागाईपासून दिलासा मिळू शकेल.

खरे तर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास अर्थव्यवस्थेची प्रगती आणि महागाई (Inflation) कमी करण्याबद्दल सकारात्मक आहेत. दोन्ही आघाड्यांवर भारत अधिक चांगली प्रगती करेल, अशी आशा आरबीआय गव्हर्नरांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना व्यक्त केली. दास म्हणाले की, देश योग्य दिशेने वाटचाल करत आहे, देशाचा जीडीपी देखील मजबूत स्थितीत आहे. देशाच्या ग्रामीण भागातही खपत वाढत आहे.

बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 188 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएम) संबोधित करताना दास म्हणाले की, भारत आपल्या विकासाच्या मार्गात मोठा बदल करण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताचा जीडीपी 8 टक्क्याने वाढत आहे. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांना मागे टाकून आपण विकासाचा हा वेग राखला आहे.

पहिल्या तिमाहीत वाढीचा दर अपेक्षेपेक्षा जास्त असेल

दास पुढे म्हणाले की, सध्या आपण मजबूत वाढीचा वेग पाहत आहोत. 2023-24 या आर्थिक वर्षातही आम्ही 8 टक्क्यांहून अधिक गती राखली. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतही आपण अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली होती.

आता ही गती आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीतही कायम आहे. आता आरबीआयचा अंदाज आहे की, एप्रिल-जून तिमाहीत आर्थिक वाढ आपल्या स्वतःच्या अंदाजापेक्षा किंचित जास्त आहे. ग्रामीण भागातही खपत वाढत आहे.

सर्वात मोठी आर्थिक सुधारणा जीएसटी

भारतासारखा (India) मोठा देश केवळ एका क्षेत्रावर अवलंबून राहू शकत नाही. आपल्याला उत्पादन, सेवा, निर्यात आणि शेतीचा एकत्रित विकास करायचा आहे. कृषी क्षेत्रात खूप काम झाले आहे. पण, अजून बरेच काही करायचे बाकी आहे. आपल्याला सप्लाय चेन आणि व्हॅल्यू चेन फ्रेमवर्क मजबूत करावे लागेल, असेही दास यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी सुधारणा जीएसटी आहे. अनेक देशांच्या तुलनेत आपल्या देशात जीएसटी खूप स्थिर झाला आहे. जीएसटी अंतर्गत दरमहा 1.7 ट्रिलियन रुपये जमा होत आहेत. तसेच व्यवसायही सोयीचा झाला, असेही शेवटी दास यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT