रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्याने मॉल्स, ज्वेलरी स्टोअर्स, पेट्रोल पंपांवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. तर, दुसरीकडे रिअल इस्टेट तज्ञांनी जमिनीचे सौदे आणि अपार्टमेंट विक्रीमध्ये वाढ झाल्याचे सांगितले.
19 मे 2023 रोजी RBI ने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. मूल्याच्या बाबतीत, मार्च 2023 पर्यंत बाजारात 2000 मूल्याच्या नोटांचा (रु. 3.62 लाख कोटी) हिस्सा 10.8% होता. RBI नुसार, 2000 रुपयांच्या सुमारे 1.8 ट्रिलियन नोटा सिस्टममध्ये परत आल्या आहेत. यापैकी, सुमारे 85% म्हणजेच1.5 ट्रिलियन रुपये बॅंकांमध्ये ठेवी म्हणून आल्या आहेत.
या दरम्यान 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्याने अनेकांचे धाबे दणानले होते. तर काहीजण याकडे पैसे कमावण्याची संधी म्हणून पाहत होते. मात्र अशात खरी बाजी मारली ती सोने-चांदी व्यावसायिक, रिअल इस्टेट क्षेत्र आणि बॅंक डिपॉसिट आणि पेट्रोल पंपांनी, गेल्या महिन्याभरात ही तिन्ही क्षेत्रे मालामाल झाली आहेत.
रिझव्र्ह बँकेने 2000 रुपयांची नोट बाजारातून बाद केल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतभर सोन्याची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ज्वेलरी स्टोअरमध्ये लोकांच्या रांगा लागत असून पिवळा धातू रोखीने विकत घेत गुलाबी नोटेपासून मुक्त होत आहेत. गेल्या काही महिन्यांत सोने-चांदीचा व्यावसायात मोठी मंदी आली होती. मात्र, दोन हजारांच्या नोटा मागे घेतल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत नोटेपासून सुटका करुन घेत आहेत.
19 मे 19 जून 2023 या एका महिन्याच्या कालावधीत रिअल इस्टेट क्षेत्रात जमीन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढले असून याला अपार्टमेंट विक्रीतून हातभार लागत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असे असताना यामध्ये रोखीच्या व्यवहाराचे प्रमाण जास्त असून, ग्राहक 2000 रुपयांच्या नोटांमध्ये व्यवहाराला प्राधान्य देत आहेत.
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्यानंतर पहिल्या 15 दिवसांत, बँक ठेवींमध्ये 3.3 लाख कोटी रुपयांची वाढ झाली, त्यापैकी सुमारे 80 टक्के वाढ एफडीसारख्या मुदत ठेवींमध्ये आहे. यासाठी बॅंकेचे ग्राहक दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर करत आहेत. SBI च्या अहवालात असेही म्हटले आहे की 2,000 रुपयांच्या नोटा मागे घेतल्याने कर्जाची परतफेड वाढली आहे.
पेट्रोल पंपांवर रोखीचे व्यवहार झपाट्याने वाढले आहेत. आणि रोख रक्कमेद्वारे पेट्रोल डिझेल खरेदी करणारे ग्राहक 2,000 रुपयांच्या नोटा वापरत आहेत. ऑल-इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (एआयपीडीए) ने म्हटले आहे की डिजिटल पेमेंट, जे पंपांवर दैनंदिन विक्रीच्या 40% होते, ते 10% पर्यंत घसरले आहे तर रोख विक्री नाट्यमय पद्धतीने वाढली आहे.
लोकांनी ऑनलाइन खरेदीमध्येही मोठ्या प्रमाणात 2000 रुपयांच्या नोटांचा वापर सुरु केला आहे. यामध्ये कॅश-ऑन-डिलिव्हरी पर्याय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही दिवसांपासून झोमॅटोचे जवळपास 75% वापरकर्ते कॅश-ऑन-डिलिव्हरी पर्याय निवडत आहेत आणि ते 2,000 रुपयांच्या नोटांनी पैसे देत आहेत. ईकॉमर्स, फूड आणि ऑनलाइन किराणा सेगमेंटमध्ये कॅश ऑन डिलिव्हरी निवडणाऱ्या ग्राहकांमध्येही वाढ दिसत असून ग्राहक 2000 रुपयांच्या नोटा वापरत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.