FREE FREE FREE: सरकारने दिली मोठी अपडेट, करोडो लोकांना मिळणार मोफत वीज! जनतेचे बल्ले-बल्ले

Rajasthan Electricity Bill: जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येत आहेत.
Electricity Bill
Electricity BillDainik Gomantak
Published on
Updated on

Rajasthan Electricity Bill: जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये लोकांना मोफत वस्तू देऊन सरकार लोकांचे बजेट थोडे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते.

दरम्यान, अनेक राज्य सरकारांकडून राज्यातील जनतेला मोफत वीजही उपलब्ध करुन दिली जात आहे. याच क्रमाने राजस्थान सरकारने नुकतीच राजस्थानमधील रहिवाशांसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राजस्थानमधील लोकांना काही युनिट मोफत वीज दिली जाणार आहे.

मोफत वीज

राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्व घरगुती किंवा व्यावसायिक वीज ग्राहकांना दरमहा 100 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे.

या घोषणेमुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच ज्यांचे वीज बिल 100 युनिटपेक्षा जास्त आहे, परंतु 200 युनिटपेक्षा कमी आहे त्यांनाही सरकारकडून (Government) काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे.

Electricity Bill
Income Tax Return: मोठी बातमी! एवढ्या लाखांची कमाई करुनही भरावा लागणार नाही टॅक्स

त्यांना देखील फायदा होणार

यासोबतच, राजस्थानमध्ये 200 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांवरील निश्चित शुल्क, इंधन अधिभार आणि इतर शुल्क माफ करण्याची घोषणा करण्यात आली. अशा परिस्थितीत 100 युनिटपेक्षा जास्त आणि 200 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

Electricity Bill
Income Tax Return: इन्कम टॅक्स भरणाऱ्यांनो सावधान, तुम्हाला भरावा लागू शकतो एवढा मोठा दंड!

वीज बिल

अशा परिस्थितीत आता राजस्थानमधील (Rajasthan) कोणत्याही ग्राहकाला पहिल्या 100 युनिट विजेच्या वापरासाठी कोणतेही बिल मिळणार नाही. या घोषणेमुळे, 100 युनिट असलेल्या ग्राहकांना वीज बिल म्हणून काहीही भरावे लागणार नाही, तर 200 युनिट असलेल्या ग्राहकांना सध्याच्या 1610 रुपयांऐवजी 503 रुपये द्यावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com