Ration shop Dainik Gomantak
अर्थविश्व

Free Ration: मोफत राशन योजनेत सरकारने केला मोठा बदल, आता फक्त हेच लोक घेऊ शकणार लाभ

Free Ration Yojana: तुम्हीही केंद्र सरकारच्या मोफत राशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

दैनिक गोमन्तक

Free Ration Yojana: तुम्हीही केंद्र सरकारच्या मोफत राशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अलीकडेच, सरकारने राशनकार्डधारकांना नवीन वर्षाची मोठी भेट देताना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने (PMGKAY) चा कालावधी एका वर्षासाठी वाढवला होता. PMGKAY अंतर्गत, पूर्वी मोफत अन्नधान्य 31 डिसेंबर 2022 पर्यंत उपलब्ध असायचे. मात्र आता ही योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

दर महिन्याला मोफत धान्य

सरकारच्या (Government) या योजनेअंतर्गत 80 कोटींहून अधिक राशनकार्डधारकांना दरमहा मोफत धान्य मिळते. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) केंद्राने एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत सुरु केली. या योजनेंतर्गत कोरोना काळापासून 81.3 कोटी लोक मोफत राशन घेत होते. या योजनेंतर्गत ज्यांच्याकडे राशनकार्ड (Ration Card) नाही अशा लोकांना सरकारकडून मोफत राशनही दिले जात होते.

योजना एप्रिल 2020 मध्ये सुरु झाली

आता फक्त गरीब राशनकार्डधारकांनाच 'राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या' अंतर्गत मोफत गहू-तांदूळ दिला जाणार आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन दरम्यान एप्रिल 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु करण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, आता ही योजना अन्न सुरक्षा योजनेत विलीन करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत खर्च करण्यात येणारा 2 लाख कोटी रुपयांचा संपूर्ण खर्च केंद्राकडून केला जाणार आहे. यामध्ये राज्यांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत.

तसेच, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, सरकार गहू-तांदूळ आणि भरड धान्य 1 ते 3 रुपये प्रति किलो दराने पुरवते. ही रक्कम डिसेंबर 2023 पर्यंत कार्डधारकांकडून वसूल केली जाणार नाही, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT