Ayushman Card Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: राशनकार्डधारकांचे बल्ले-बल्ले, ही बातमी वाचून तुम्हीही म्हणाल...

Ration Card Latest Rules: तुमच्याकडेही राशन कार्ड असेल तर सरकारकडून मिळणारी सुविधा ऐकून तुम्हालाही आनंद होईल.

दैनिक गोमन्तक

Ration Card Holder Ayushman Card: तुमच्याकडेही राशन कार्ड असेल तर सरकारकडून मिळणारी सुविधा ऐकून तुम्हालाही आनंद होईल. शासन राशनकार्डधारकांना नवनवीन सुविधा देत असते. आता सरकारने अंत्योदय राशनकार्डधारकांच्या आरोग्याचा विचार करुन सर्व कुटुंबांसाठी आणखी एक सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जिल्हा आणि तहसील स्तरावर विशेष मोहिमा

यासाठी शासनाकडून जिल्हा आणि तहसील स्तरावर विशेष मोहीमही राबविण्यात आली आहे. या अंतर्गत अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आयुष्मान कार्ड बनवण्याचे ध्येय आहे. जनसुविधा केंद्रांवरही सरकार ही सुविधा देत आहे. तुम्ही राशनकार्ड दाखवून जन सुविधा केंद्रात आयुष्मान कार्डसाठी अर्ज करु शकता. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारने अंत्योदय कार्डधारकांचे आयुष्मान कार्ड बनवण्याचे आदेश दिले आहेत.

शक्य तितक्या लवकर प्रक्रिया पूर्ण करा

सरकारने (Government) आयुष्मान कार्ड बनवण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व अंत्योदय कार्डधारकांची आयुष्मान कार्ड बनवली जाणार आहेत. ज्या अंत्योदय कार्डधारकांकडे आयुष्मान कार्ड उपलब्ध नाही, त्यांना सरकारकडून या सुविधेविषयी सांगण्यात येत आहे.

नवीन आयुष्मान कार्ड तयार होत नाहीत

पात्र लाभार्थी आयुष्मान कार्ड बनवल्यानंतर सार्वजनिक सेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान पॅनेलशी संलग्न खाजगी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात अंत्योदय कार्ड दाखवून आयुष्मान कार्ड मिळवू शकतात. सध्या सरकारकडून नवीन आयुष्मान कार्ड बनवले जात नाहीत. मात्र, ज्या लाभार्थ्यांची नावे या योजनेत आहेत, त्यांचीच कार्डे बनवली जात आहेत.

तसेच, अंत्योदय कार्डधारकांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास उपचारासाठी भटकावे लागणार नाही, अशी शासनाची योजना आहे. त्यासाठी शासनस्तरावरुन सूचनाही देण्यात आल्या आहेत. दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना अंत्योदय राशनकार्ड दिली जाते. या कार्डद्वारे लाभार्थ्यांना दर महिन्याला परवडणाऱ्या किमतीत खाद्यपदार्थ मिळतात. कार्डधारकांना एकूण 35 किलो गहू आणि तांदूळ दिले जाते. यासाठी प्रतिकिलो गहू 2 रुपये आणि तांदूळ प्रति किलो 3 रुपये मोजावे लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: IND vs PAK मॅच होणार नाही! आशिया कपमधून पाकिस्तान 'आऊट', आता 'या' देशाच्या संघाला मिळणार संधी

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

SCROLL FOR NEXT