Ration Card Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card Eligibility: राशनकार्ड घेण्यासाठी तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येतात? जाणून घ्या

Delhi Ration Card: शासनाकडून गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

दैनिक गोमन्तक

Ration Card Apply: शासनाकडून गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांमध्ये सरकारकडून गरिबांना मोफत किंवा कमी दरात राशनही दिले जात आहे. त्याचबरोबर अनेक जीवनावश्यक वस्तूही शासनाकडून राशनकार्डद्वारे गरिबांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. राशनकार्ड हे एक दस्तऐवज आहे, जे राशन, पुरवठा आणि ग्राहक पुरवठा विभागामार्फत पुरवले जाते. त्याचा उद्देश देशातील नागरिकांना अनुदानित किमतीत अन्नधान्य उपलब्ध करुन देणे हा आहे.

राशनकार्ड

प्रत्येक राज्य सरकारकडून वेगवेगळे राशनकार्ड जारी केले जाते. त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) गरिबांना राशनकार्ड दिले जाते. राशनकार्ड हे संपूर्ण देशात ओळखीच्या पुराव्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्याचवेळी दिल्लीत चार प्रकारच्या राशनकार्डांचे वितरण केले जाते. अशा परिस्थितीत, कोणत्या श्रेणीतील लोकांना राशनकार्ड (Ration Card) दिले जाते.

BPL

दारिद्र्यरेषेखालील अशा लोकांना बीपीएल राशन कार्ड दिले जाते.

APL

एपीएल राशनकार्ड अशा लोकांना दिले जाते, जे दारिद्र्यरेषेखालील आणि मध्यमवर्गीय आहेत.

AAY

इतर वर्गातील लोकांपेक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा लोकांना अंत्योदय योजनेअंतर्गत AAY राशनकार्ड दिले जाते.

AY

अन्नपूर्णा योजनेंतर्गत लोकांना AY राशन कार्ड दिले जाते आणि त्यांना दर महिन्याला 10 किलो तांदूळ मोफत मिळण्याचा हक्क असेल. यासाठी व्यक्तीचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि त्याच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT