Union Minister of Railways Dainik Gomantak
अर्थविश्व

Railway Concession To Senior Citizen: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात पुन्हा सवलत, नियम बदलणार!

Rail Ticket Concession: ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती पुनर्स्थापित करण्याच्या विचारात आहे.

दैनिक गोमन्तक

Railway Concession to Senior Citizen: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. कोरोना काळात बंद पडलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंसह इतर श्रेणीतील प्रवाशांना सवलतीच्या तिकिटांची सेवा पुन्हा सुरु करण्याचा भारतीय रेल्वेचा विचार आहे. वास्तविक, टीकेनंतर रेल्वे ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती पुनर्स्थापित करण्याच्या विचारात आहे, परंतु ते फक्त सामान्य आणि स्लीपर क्लाससाठीच असेल.

ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा मिळणार रेल्वे भाड्यात सवलत!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार (Government) वयाच्या निकषांप्रमाणे आपल्या अटी आणि शर्तींमध्ये बदल करु शकते. असे होऊ शकते की, 'सरकार 70 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना सवलतीच्या भाड्याची सुविधा देईल, जी पूर्वी 58 वर्षांच्या महिला आणि 60 वर्षांच्या पुरुषांसाठी होती.'

पूर्वी सवलत मिळत होती

मार्च 2020 पूर्वी, रेल्वे (Railway) महिलांना 50 टक्के आणि पुरुषांना 40 टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सर्व क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी देत ​​होती. रेल्वेकडून ही सूट घेण्याची किमान वयोमर्यादा महिलांसाठी 58 आणि पुरुषांसाठी 60 वर्षे होती.

वास्तविक, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यामागचे महत्तवाचे कारण म्हणजे, बहुतेक वृद्धांकडे उत्पन्नाचा स्रोत नसतो. यानंतर मार्च 2020 मध्ये कोरोना संकट आल्यानंतर, सरकारने त्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी दिलेल्या सेवा सवलती बंद केल्या होत्या, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवास महाग झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT