Punjab National Bank: देशातील सरकारी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. तुमचेही सरकारी बँकेत खाते असेल तर 31 ऑगस्टनंतर तुम्ही पैशांचे व्यवहार करु शकणार नाही. होय...
पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना (पीएनबी ग्राहक) नोटीस जारी करुन याबद्दल सांगितले आहे. PNB मध्ये देशभरात करोडो लोकांची खाती आहेत. बँकेने सांगितले आहे की, ज्या ग्राहकांनी आतापर्यंत डिटेल्स (KYC Details) अपडेट केले नाहीत. या सर्वांना बँकेच्या वतीने नोटीस पाठवण्यात येत आहे.
PNB ने सांगितले की, यासाठी अंतिम मुदत देखील घोषित करण्यात आली आहे. तुम्हाला हे काम 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करायचे आहे. जे ग्राहक हे काम देय तारखेपर्यंत पूर्ण करणार नाहीत, त्यांना बँकिंग व्यवहारात अडचणी येऊ शकतात.
2 ऑगस्ट 2023 रोजी माहिती देताना पंजाब नॅशनल बँकेने सांगितले होते की, ज्या ग्राहकांचे KYC अपडेट नाही अशा सर्व ग्राहकांना बँकेकडून नोंदणीकृत पत्त्यावर नोटीस पाठवली जात आहे.
यासोबतच त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरही मेसेज पाठवला जात आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना RBI च्या नियमांनुसार 31 ऑगस्ट 2023 पूर्वी त्यांची KYC डिटेल्स अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, सर्व ग्राहकांनी (Customers) केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. जर तुम्ही 31 जुलैपर्यंत तुम्ही केवायसी अपडेट केली नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन हे काम करुन घेऊ शकता. याशिवाय बँकेच्या वेबसाइटवरुनही केवायसी अपडेट करता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.