Electric Vehicle Dainik Gomantak
अर्थविश्व

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहन घ्यायचा विचार करताय? थोडं थांबा, आधी हे वाचा

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापूर्वी वाहन बाजारात झालेले महत्वाचे बदल आणि त्याचे वाहन खरेदीवर होणारे परिणाम जाणून घ्या.

Pramod Yadav

वाढती महागाई आणि इंधनाचे वाढलेले भाव यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) खरेदी करत आहेत. सरकार देखील यासाठी सबसिडी देत असून, इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन देत आहे. अलिकडे पेट्रोल किंवा डिझेल (Petrol-Diesel) वाहन खरेदी करण्याऐवजी अनेकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास पसंदी देत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापूर्वी वाहन बाजारात झालेले महत्वाचे बदल आणि त्याचे वाहन खरेदीवर होणारे परिणाम जाणून घ्या.

इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या आर्थिक वर्षात 15 टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची किंमती वाढू शकतात. याचे सर्वात मोठे कारण बॅटरीची वाढती किंमत हे सांगितले जात आहे. तसेच, इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षा नियमांसह इतर नियमांमध्ये अलीकडील बदल करण्यात आले आहेत. हे देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती वाढविण्यात महत्त्वपूर्ण कारण ठरणार आहे.

इलेक्ट्रिक वाहने पेट घेण्याच्या अनेक घटना लक्षात घेऊन सरकारने अलीकडेच बॅटरीसाठी सुधारित चाचणी मानके तयार केली आहेत. नवीन बॅटरी सुरक्षा निर्बंध दोन टप्प्यांत वाढवण्यात आले आहेत, त्यापैकी पहिला 1 डिसेंबर 2022 पर्यंत लागू करण्यात आला आणि दुसरा 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे कारण कठोर बॅटरी चाचणी मानकांमुळे पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये बॅटरीच्या किमती 3-5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात हा खर्च 15 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT