Mumbai To Dubai Air Ticket Dainik Gomantak
अर्थविश्व

Dubai-India Air Ticket Price: 5000 रुपयांत करा मुंबई ते दुबईची हवाई सफर !

महाराष्ट्रात दुबई किंवा संयुक्त अरब अमिरातहून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांच्या होम क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमध्ये ही सुट देण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

दुबई हा भारतातील लोकांसाठी प्रेक्षणीय देश आहे. भारतातील बरेच लोक तेथे भेट देतात. यामुळेच शारजाहची लो कॉस्ट कॅरिअर एअर अरबियाने भारतातील शहरांसाठी विशेष योजना आणली आहे. ही योजना भारतातील फक्त 13 शहरांसाठी आहे. दुबई (Dubai) ते भारतातील 13 शहरांचा हवाई प्रवास आता स्वस्त होणार आहे. या एकेरी मार्गावरील विमान भाडे हे 250 दिरहम म्हणजेच जवळपास 5 हजार रुपयांपासून सुरु होते.Mumbai To Dubai Air Ticket

खलीज टाईम्सच्या एका रिपोर्ट ने दिलेल्या माहीती नुसार एअर अरबियाने दिल्ली(Delhi), मुंबई, अहमदाबाद, गोवा (Goa), हैदराबाद, जयपूर, बंगळुरु, नागपूर(Nagpur) सारख्या शहरांसाठी हे प्रवास भाडे ठरविले आहे. शिवाय एअर अरबियाने रास अल खैमाह आणि शारजाह विमानतळ असे शटल बससेवा सुध्दा सुरु केली आहे. याचे भाडे हे 610 रुपये आहे.

महाराष्ट्रात दुबई किंवा संयुक्त अरब अमिरातहून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांच्या होम क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना विमानतळावर आरटीपीसीआर करण्याची देखील गरज नाही असे सांगितले होते. महत्वाचे म्हणजे कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमध्ये ही सुट देण्यात आली होती.

दुबईतील ट्रॅव्हल एजंट्सनी यासंदर्भात सांगितले की, भारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी होम क्वारंटाईन घोषित केले आणि मग UAE ते भारताचे विमान भाडे भरपूर कमी झाले. एका एजंटने सांगितले की, 'लोकांना पुन्हा फ्लाइट बंद होण्याची भीती वाटत असल्याने लोक विमान प्रवास टाळत आहेत.'

काही स्थानिक UAE एअरलाईन्सच्या वेबसाइट्स भारतातील प्रमुख शहरांसाठी कमी केलेले विमान भाडे दाखवत आहेत. भारतातील (India) या प्रमुख शहरांमध्ये किमान 300 दिहराम म्हणजेच सुमारे 6 हजार रुपयात प्रवास करता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT