LPG Price Hike News, LPG Price news updates Dainik Gomantak
अर्थविश्व

LPGच्या दरांचा भडका; एका सिलिंडरमागे 50 रुपयांची वाढ

राज्य-समर्थित तेल उत्पादक कंपन्यांनी (OMCs) आजपासून घरगुती एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रति सिलेंडर 50 रुपयांची वाढ केली.

दैनिक गोमन्तक

राज्य-समर्थित तेल उत्पादक कंपन्यांनी (OMCs) आजपासून घरगुती एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रति सिलेंडर 50 रुपयांची वाढ केली. या दरवाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 रुपये एवढी असणार आहे. (The price of domestic LPG has been increased by Rs 50 per cylinder.)

गेल्या वर्षी 6 ऑक्टोबरनंतर एलपीजीच्या दरात झालेली ही पहिलीच वाढ. त्यावेळी दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपये एवढी होती. (LPG Price Hike News)

तेल विपणन कंपन्या 14.2 किलोचे सिलिंडर देशांतर्गत घरांना खुल्या बाजाराप्रमाणेच विकत असतात. सरकार एका वर्षात प्रत्येक कुटुंबाला अशा 12 सिलिंडरवर सबसिडी देते. हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिपॉजिट केले जातात.

ऑक्टोबरमध्ये एलपीजीच्या (LPG) किमतींमध्ये शेवटची सुधारणा करण्यात आली होती, तर उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा येथील निवडणुकांपूर्वी 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.

सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले आहे की, 5 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता 349 रुपये असणार, तर 10 किलोच्या कंपोझिट बाटलीची किंमत 669 रुपये असणार आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 2,003.50 रुपये एवढी असणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किमती एलपीजीचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क दर आणि यूएस डॉलर आणि भारतीय रुपयाच्या विनिमय दरावर आधारित ठरवलेल्या असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT