Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

PPF Calculator: पीपीएफबाबत अर्थमंत्री करणार मोठी घोषणा, 'या' खास ट्र‍िकने तुम्ही बनू शकता करोडपती!

Public Provident Fund: यंदाच्या अर्थसंकल्पात PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याची मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Public Provident Fund: यंदाच्या अर्थसंकल्पात PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याची मागणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली जात आहे.

वास्तविक, नोकरदार आणि सर्व सामान्यांसाठी हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. यामध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि त्यात चांगला परतावाही मिळतो. विशेष म्हणजे, करही वाचतो.

दरम्यान, गुंतवणुकीची मर्यादा दीड लाखांवरुन तीन लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी यावेळी तज्ज्ञांकडून अर्थमंत्र्यांकडे केली जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, त्यात गुंतवणूक करुन तुम्ही दीड कोटीचा फंड कसा उभारु शकता.

जर नसेल तर आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देऊ की, जास्तीत जास्त व्याज मिळवून तुम्ही तुमची रक्कम अनेक पटींनी कशी वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर...

याप्रमाणे दीड कोटींचा निधी उभारता येणार

एका वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 12,500 रुपये गुंतवता. 15 वर्षांच्या मुदतीनंतर, तुम्ही तुमचे पीपीएफ खाते 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता.

अशा परिस्थितीत, 30 वर्षांनंतर, तुमच्या PPF खात्याचा संपूर्ण निधी 1.5 कोटी (1,54,50,911) पेक्षा जास्त असेल. यामध्ये तुमची गुंतवणूक 45 लाख रुपये असेल आणि व्याजातून (Interest) मिळणारे उत्पन्न सुमारे 1.09 कोटी रुपये असेल.

वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात करा

तुम्ही पीपीएफमध्ये जितक्या लवकर गुंतवणूक (Investment) करायला सुरुवात कराल तितके जास्त फायदे तुम्हाला मिळतील. समजा तुमचे वय 25 वर्षे आहे आणि तुम्ही पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख गुंतवले, तर तुम्ही वयाच्या 55 व्या वर्षी म्हणजे निवृत्तीच्या सुमारे 5 वर्षे आधी करोडपती होऊ शकता.

व्याज कसे मोजले जाते

PPF वर मासिक आधारावर व्याज मोजले जाते. पण हे पैसे आर्थिक वर्षाच्या शेवटी तुमच्या खात्यात जमा होतात. म्हणजेच, तुम्ही दरमहा कमावलेले व्याज 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात तुमच्या PPF खात्यात जमा केले जाईल.

पीपीएफमध्ये पैसे कधी जमा करायचे याची कोणतीही निश्चित तारीख नाही. तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर पैसे जमा करु शकता.

अधिक व्याज मिळविण्याचा मार्ग

पीपीएफवरील व्याजाची गणना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत केली जाते. ही गणना खात्यातील रकमेवर केली जाते.

तुम्ही पीपीएफ खात्यात कोणत्याही महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा केल्यास, त्या पैशावर त्याच महिन्यात व्याज मिळेल, परंतु तुम्ही 5 तारखेनंतर किंवा 6 व्या दिवसानंतर पैसे जमा केल्यास, पुढील जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळेल.

सोप्या पध्दतीने समजून घ्या

समजा तुम्ही 5 एप्रिल रोजी तुमच्या खात्यात 50,000 रुपये जमा केले, तर 31 मार्चपर्यंत तुमच्या खात्यात आधीपासूनच 10 लाख रुपये आहेत. 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत तुमच्या PPF खात्यातील एकूण रक्कम 10,50,000 रुपये होती. यावर मासिक व्याज 7.1% - (7.1%/12 X 1050000) = 6212 रु.

आता समजा तुम्ही 50,000 रुपयांची रक्कम 5 एप्रिलपर्यंत आणि नंतर 6 एप्रिलपर्यंत जमा केली नाही. 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत तुमच्या खात्यातील किमान शिल्लक 10 लाख रुपये असेल. यावर 7.1% (7.1%/12 X 10,00,000) = 5917 रुपये मासिक व्याज किती होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT