Post Office RD Scheme: प्रत्येक व्यक्तीला आपले कष्टाचे पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे असतात, जिथे ते सुरक्षित राहतील आणि चांगला परतावा (Return) मिळेल. कुटुंबाच्या भविष्यासाठी बचत आणि गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मुलांचे शिक्षण, लग्न आणि इतर गरजांसाठी भरपूर पैशांची गरज असते.
अशावेळी, पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना एक बेस्ट ऑप्शन म्हणून समोर आली आहे. ही योजना केवळ सुरक्षितच नाहीतर नियमित बचतीद्वारे एक मोठा फंड तयार करण्यासाठीही मदत करते. चला तर मग वेळ न दौडता या योजनेबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया...
पोस्ट ऑफिस (Post Office) रिकरिंग डिपॉझिट (RD) ही एक सरकारी बचत योजना आहे, ज्यात गुंतवणूकदाराला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात कोणत्याही प्रकारची मार्केट रिस्क (Market Risk) नाही. तुमच्या गुंतवणुकीची पूर्ण सुरक्षितता सरकारी हमीमुळे मिळते.
सध्या या योजनेत 6.7 टक्के वार्षिक व्याजदर मिळतो, जो चक्रवाढ (Compounding) पद्धतीने वाढत जातो. याचा अर्थ, तुम्हाला व्याजावरही व्याज मिळते, ज्यामुळे तुमची रक्कम खूप वेगाने वाढते. योजनेचा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला 15 लाखाहून रुपये मिळतात.
पोस्ट ऑफिस RD खाते उघडणे खूप सोपे आहे. तुम्ही केवळ 100 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक सुरु करु शकता. यात कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कितीही रक्कम जमा करु शकता. या खात्याची एकूण मुदत 5 वर्षांची असते, पण गरज असल्यास तुम्ही ही मुदत 5 वर्षे पूर्ण झाल्यावर आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता. खाते उघडल्यानंतर 3 वर्षांनी ते बंद करण्याचा पर्यायही उपलब्ध असतो.
दरम्यान, या योजनेत खातेदाराचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्ती (Nominee) संपूर्ण रक्कम काढू शकते किंवा खाते सुरु ठेवू शकते. तसेच, 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही मुलगा आपल्या पालकांसोबत संयुक्त खाते उघडू शकतो. 18 वर्षांचे झाल्यावर त्याला फक्त KYC अपडेट करावे लागते.
या सर्व फायद्यांमुळे ज्या व्यक्तींना हळूहळू पण सुरक्षितरित्या पैशांची गुंतवणूक (Investment) करायची आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसची RD योजना एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.