Post Office Scheme
Post Office Scheme  Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office Scheme: 100 रुपये गुंतवा आणि 5 वर्षात 20 लाख रुपये मिळवा

दैनिक गोमन्तक

Post Office Scheme: पोस्ट ऑफिस योजना एक सुरक्षित आणि उत्तम गुंतवणूक पर्याय आहेत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, फक्त 100 रुपयांची छोटी बचत तुम्हाला काही वर्षांत चांगला परतावा देऊ शकते. वास्तविक, सर्वसामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या सरकारी योजना पोस्ट कार्यालयाकडून राबवल्या जात आहेत. परंतु ही योजना इतर बचत योजनेपेक्षा अधिक फायदेशीर ठरते. (Post office profitable scheme)

पोस्ट ऑफिस योजना (Post Office Scheme)

पोस्ट ऑफिस योजना एक सुरक्षित आणि उत्तम गुंतवणूक पर्याय आहेत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, फक्त 100 रुपयांची छोटी बचत तुम्हाला काही वर्षांत चांगला परतावा देऊ शकते. या योजनेत, तुम्ही फक्त 100 रुपयांची अल्प बचत करून काही वर्षांत करोडपती होऊ शकता. या सरकारी योजनेत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आहे. NSC मध्ये गुंतवणूक (Investmet) केल्याने, तुम्हाला खात्रीशीर परतावा तसेच सुरक्षिततेची पूर्ण हमी मिळते.

पोस्ट ऑफिस स्कीममध्ये छोटी रक्कम गुंतवून तुम्हाला मोठा परतावा मिळवायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेद्वारे फक्त 100 रुपये गुंतवून तुम्ही पाच वर्षांत 20 लाख रुपये कमवू शकता.

भारत सरकारची खात्रीशीर उत्पन्न गुंतवणूक योजना

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ही भारत सरकारची खात्रीशीर उत्पन्न गुंतवणूक योजना आहे, जी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत जाऊन गुंतवणूक करू शकता. तसेच, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत केवळ वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते. NSC मध्ये, तुम्हाला वार्षिक 6.8% परतावा मिळतो. प्रामुख्याने लहान ते मध्यम उत्पन्न गुंतवणूकदारांना आयकर बचत करताना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते.

तुम्हाला काही वर्षांत मोठी रक्कम मिळवायची असेल तर तुम्ही NSC ची निवड करू शकता तसेच, तुमचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये पूर्णपणे सुरक्षित असतील. तुम्ही कोणत्याही जोखमीशिवाय NSC मध्ये पैसे गुंतवू शकता आणि योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांसाठी निश्चित केला आहे.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही 1 वर्षाच्या आत पैसे देखील काढू शकता, परंतु या योजने संदर्भात काही अटी लागू आहेत. सरकार आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला व्याजदर ठरवते. ही योजना सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रथम 1000 रुपये जमा करावे लागतील. यानंतर, तुम्ही या योजनेत फक्त 100 रुपये प्रति महिना गुंतवणूक सुरू करू शकता. ही योजना वार्षिक 6.8 टक्के व्याजदर देते आणि आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत तुम्हाला 1.5 लाख रुपयांची कर सूटही मिळू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT