"PM Narendra Modi wants to set Manipur on fire"; Rahul Gandhi's attack Dainik Gomantak
अर्थविश्व

Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींना मणिपूर पेटवायचे आहे; राहुल यांच्या पत्रकार परिषदेतील 4 महत्त्वाचे मुद्दे

PM Narendra Modi: याला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत उत्तर दिले. यामध्ये पतप्रधान मोदी यांनी मणिपूर हिंसाचाराबाबत एकही शब्द काढला नाही.

Ashutosh Masgaunde

"PM Narendra Modi wants to set Manipur on fire"; Rahul Gandhi's attack:

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे.

याला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत उत्तर दिले. यामध्ये पतप्रधान मोदी यांनी मणिपूर हिंसाचाराबाबत एकही शब्द काढला नाही.

यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूर पेटवायचे आहे. असे विधान केले.

राहुल यांच्या पत्रकार परिषदेतील 4 महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधानांना हे शोभत नाही

मणिपूर जळत आहे आणि पंतप्रधान हसत हसत बोलत होते, हे त्यांना शोभत नाही. भारतात कुठेतरी हिंसाचार होत असेल तर त्यांनी असे हसून बोलू नये.

19 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे कधीच पाहिले नाही

मी जवळपास 19 वर्षे राजकारणात आहे. प्रत्येक राज्यात गेलो. पूर, त्सुनामी, हिंसाचार घडतो, आपण जातो. माझ्या 19 वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिलं ते मी इतरत्र कुठेही पाहिलं नाही.

कुकी-मीतेई एकमेकांचे शत्रू

मणिपूरमध्ये मीतेई भागात गेल्यावर आम्हाला सांगण्यात आले की जर तुमच्या सुरक्षा पथकात कुकी लोक असतील तर आम्ही गोळीबार करू.

जेव्हा कुकीच्या भागात गेला तेव्हा त्यांनी सांगितले की जर मीतेई तुमच्या सुरक्षा पथकात असतील तर त्यांना मारले जाईल. मणिपूर दोन भागात विभागले गेले आहे.

पंतप्रधानांना मणिपूर जाळायचे आहे

आपल्या देशात काय चालले आहे, हे पंतप्रधानांना कळलेले दिसत नाही. ते तिकडे जाऊ शकत नसतील तर बोलायला पाहिजे. मणिपूरमध्ये जे काही चालले आहे ते लष्कर दोन दिवसांत थांबवू शकते. पंतप्रधानांना मणिपूर जाळायचे आहे, वाचवायचे नाही.

20 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. संपूर्ण अधिवेशनात विरोधकांनी मणिपूरमधील हिंसाचारावर गदारोळ केला.

ते पंतप्रधान मोदींना मणिपूरवर बोलण्याची मागणी करत होते. यासाठी विरोधकांनी 26 जुलै रोजी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जुलैला लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांचा प्रस्ताव मान्य केला.

दुसरीकडे, गुरुवारी (10 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. मोदींनी 2 तास 12 मिनिटांचे भाषण केले, त्यात 1 तास 32 मिनिटे बोलल्यानंतर मणिपूरवर भाष्य केले.

पंतप्रधान म्हणाले, मी सर्व देशवासियांना आश्वस्त करू इच्छितो की, जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातून शांततेचा चेहरा नजीकच्या भविष्यात नक्कीच समोर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT