Vande Bharat Express
Vande Bharat Express Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Express: साई भक्तांना मिळणार 'वंदे भारत'ची भेट, PM मोदी दाखवणार ग्रीन सिग्नल

Manish Jadhav

Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मुंबईत 2 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यातील एक ट्रेन मुंबई ते सोलापूर दरम्यान तर दुसरी ट्रेन मुंबई ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणार आहे.

या गाड्यांना मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन अशी नावे देण्यात आली आहेत. आतापर्यंत देशवासीयांना 8 सेमी-हाय स्पीड वंदे भारत गाड्या भेट देण्यात आल्या आहेत, ज्या देशाच्या विविध राज्यांमध्ये सेवा देत आहेत.

प्रवाशांना प्रवास सुखकर होणार आहे

मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन ही देशातील 9वी वंदे भारत ट्रेन असेल. या जागतिक दर्जाच्या ट्रेनमुळे प्रवाशांना मुंबई ते सोलापूर दरम्यान आरामात प्रवास करता येणार आहे. या ट्रेनमुळे सोलापूरमधील सिद्धेश्वर, सोलापूरजवळील अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि

पुण्याजवळील आळंदी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांमध्ये प्रवाशांना (Passengers) प्रवासाची मोठी सोय होणार आहे. तर, मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन ही देशातील 10वी वंदे भारत ट्रेन असेल. या ट्रेनमुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी, शनी शिंगणापूर या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा प्रवास सुकर होणार आहे.

जाणून घ्या या गाड्यांचे भाडे किती असू शकते

मुंबई-शिर्डी सेमी-हाय-स्पीड ट्रेनच्या चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी मुंबई ते नाशिक या प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे 550 आणि 1150 रुपये खर्च करावे लागतील.

त्याचवेळी, मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे चेअर कारसाठी 800 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 1,630 रुपये असू शकते. एका अंदाजानुसार, दरवर्षी 50 लाखांहून अधिक लोक मुंबईहून (Mumbai) शिर्डीला जातात, त्यामुळे ही ट्रेन त्यांच्यासाठी खूप सोयीची ठरु शकते.

वंदे भारत एक्सप्रेसची रचना देशातच करण्यात आली आहे

देशातील विविध शहरांना जोडण्यासाठी आतापर्यंत भारतात 8 वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये मुंबई ते गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशी बनावटीची सेमी हाय-स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ट्रेन 16 डब्यांची आहे. ही ट्रेन अवघ्या 140 सेकंदात 160 किमी प्रतितास वेग गाठू शकते आणि प्रवाशांना प्रवासाचा उत्कृष्ट अनुभव देखील देते. ही ट्रेन अनेक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे आणि त्यामुळेच प्रवाशांना ती खूप आवडते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: खोर्ली-म्हापसा येथे आढळला पुरुषाचा मृतदेह

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

SCROLL FOR NEXT