PM Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Narendra Modi Speech: 12 लाखांपर्यंत आयकर माफ, जीएसटीत सूट; मोदींची घोषणा मध्यमवर्गासाठी ठरली 'डबल बोनस'

PM Narendra Modi On GST Reform: देशभरात जीएसटी रिफॉर्म लागू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी मध्यमवर्गासाठी ही एक मोठी भेट असल्याचे म्हटले.

Manish Jadhav

PM Narendra Modi Speech: देशभरात जीएसटी रिफॉर्म लागू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी मध्यमवर्गासाठी ही एक मोठी भेट असल्याचे म्हटले. सरकारने यापूर्वीच 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत देऊन मध्यमवर्गाला दिलासा दिला होता आणि आता 22 सप्टेंबरपासून देशभरात जीएसटी सुधारणा लागू होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. विशेष म्हणजे, ही जीएसटी सुधारणा नव्या मध्यमवर्गासाठी 'डबल फायदा' ठरेल असेही त्यांनी नमूद केले.

नव्या मध्यमवर्गासाठी दुहेरा फायदा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जीएसटी (GST) सुधारणेमुळे आता वस्तूंवर केवळ 5 आणि 18 टक्के कर लागेल. ही जीएसटी सुधारणा नव्या मध्यमवर्गासाठी दुहेरी फायदा ठरेल. जीएसटी सुधारणांचे फायदे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, आता नव्या मध्यमवर्गासाठी त्यांची स्वप्ने पूर्ण करणे अधिक सोपे होईल. फ्रीज, टीव्ही, एसी सारख्या गरजेच्या वस्तू आणि घर बांधणे पूर्वीपेक्षा स्वस्त होईल, ज्यामुळे सामान्य माणसाची बचत वाढेल.

आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वाचे पाऊल

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच जीएसटी सुधारणा लागू होत असल्याने देश आत्मनिर्भर भारतासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. उद्या म्हणजेच नवरात्रीच्या सकाळपासूनच देशात ‘न्यू जनरेशन जीएसटी’ लागू होईल आणि देशभरात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरु होईल. यामुळे सामान्य माणसाची बचत वाढेल आणि मध्यमवर्ग अधिक गरजेच्या वस्तू खरेदी करु शकेल. यासोबतच, जीएसटी सुधारणांमुळे मध्यमवर्गासोबतच दुकानदारांनाही मोठा फायदा होईल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

विविध करांच्या जाळ्यातून सुटका

जीएसटी सुधारणेपूर्वी आपल्या भाषणात पंतप्रधान पुढे म्हणाले की, देशवासी आणि व्यापारी विविध करांच्या जाळ्यात अडकले होते. यात एंट्री टॅक्स (Tax), व्हॅट, सर्व्हिस टॅक्स आणि अशा अनेक करांचा समावेश होता. ते पुढे म्हणाले की, आधी देशात एका शहरातून दुसऱ्या शहरात सामान पाठवण्यासाठी अनेक फॉर्म भरावे लागत होते. पण 2014 मध्ये जेव्हा देशवासीयांनी आम्हाला संधी दिली, तेव्हा आम्ही जीएसटीला आमच्या प्राथमिकतांमध्ये ठेवले आणि सर्व राज्ये व भागधारक (स्टेक होल्डर्स) यांचा विश्वास संपादन करुन देशभरात जीएसटी कायदा लागू केला. आता सरकार देशाची सध्याची गरज आणि भविष्यातील योजना लक्षात घेऊन जीएसटी सुधारणा करत असल्याचे देखील पंतप्रधानांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

SCROLL FOR NEXT