PM Modi announce Gati Shakti yojna of 100 trillion rupees  Dainik Gomantak
अर्थविश्व

भारताची 'गती शक्ती' वाढणार,मोदींकडून 100 लाख कोटींच्या योजनेची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना सांगितले की भारत 100 ट्रिलियन रुपयांची राष्ट्रीय पायाभूत योजना गती शक्ती (Gati Shakti Yojna) योजनेची घोषणा केली आहे

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज देशाला संबोधित करताना सांगितले की भारत 100 ट्रिलियन रुपयांची राष्ट्रीय पायाभूत योजना करणार असून यामुळे रोजगार निर्माण करण्यासाठी आणि देशातील हवामान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वच्छ इंधनाचा वापर वाढविण्यात मदत होईल.तसेच "गती शक्ती (Gati Shakti Yojna) नावाचा पायाभूत कार्यक्रम उद्योगांची उत्पादकता वाढवण्यास आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यास मदत करेल."असे माथी त्यांनी व्यक्त केले आहे. (PM Modi announce Gati Shakti yojna of 100 trillion rupees )

पंतप्रधान म्हणाले, "आम्ही गती शक्तीसाठी एक मास्टर प्लॅन सुरू करणार आहोत , हा एक मेगा प्रोग्राम आहे जो लाखो लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करेल. ही योजना स्थानिक उत्पादकांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास आणि भविष्यातील अर्थव्यवस्था सुदृढ करण्यास मदत करेल.आणि यातून विकासाचे नवीन मार्ग निर्माण होतील ."

भारत सध्या आशियाची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि त्याच्या पायाभूत सुविधांना चालना देणे हे पंतप्रधानांच्या योजनेचे केंद्र आहे. पंतप्रधानांच्या या पुढाकारामुळे देश कोविड -१९ महामारीमुळे झालेल्या तीव्र आर्थिक परिणामांमधून सावरण्यास मदत होईल. कोरोना महामारीच्या झपाट्याने वाढणाऱ्या संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे गेल्या आर्थिक वर्षात भारताचे आर्थिक उत्पादन विक्रमी कमी झाले. यानंतर, COVID-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे आर्थिक सुधारणांच्या गतीवरही मोठा परिणाम पाहायला मिळाला.

पंतप्रधानांनी 2047 पर्यंत ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र होण्याचे ध्येय देखील ठेवले आहे. ते म्हणाले की, "ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र होण्याचे ध्येय इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या मिश्रणाद्वारे साध्य करता येते, आपला देश वायूवर आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे आणि यामुळे देश हायड्रोजन उत्पादनाचे केंद्र बनू शकतो. देश ऊर्जा जास्त खर्च करते विजेच्या आयातीवर वार्षिक 12 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त, ज्यामुळे ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र असणे महत्वाचे आणि आवश्यक आहे.

सरकारच्या स्वच्छ ऊर्जा योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. ते म्हणाले, "भारत आपले हवामान ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT