PM Kisan Scheme  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana: 2 कोटी शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा 13 वा हप्ता!

13th Installment of PM Kisan Yojana: शेतकरी पीएम किसान योजनेच्या 13 हप्त्याची वाट पाहत आहेत. आता याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

13th Installment of PM Kisan Yojana: शेतकरी पीएम किसान योजनेच्या 13 हप्त्याची वाट पाहत आहेत. आता याबाबत एक नवीन अपडेटही समोर आली आहे. केंद्र सरकारने बनावट शेतकर्‍यांचा छडा लावण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. याअंतर्गत पंतप्रधान किसान योजनेच्या यादीतून 2 कोटी शेतकऱ्यांची नावे काढून टाकण्यात आली आहेत, म्हणजेच, या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे.

या शेतकऱ्यांची नावे वगळली!

विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या (Central Government) या योजनेंतर्गत अनेक राज्यांतील शेतकऱ्यांची (Farmer) नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. सरकारने सांगितले की, या योजनेंतर्गत सातत्याने होणारी फसवणूक रोखण्यासाठी आधार लिंक असलेले फिल्टर बसवण्यात आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची ओळख पटवली जात आहे. आणि यामुळेच शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि अद्याप आधार लिंक केले नसेल किंवा केवायसी (ई-केवायसी) केले नसेल, तर ते ताबडतोब करा, अन्यथा 13 व्या हप्त्याची रक्कम (पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता) तुम्हाला दिली जाणार नाही.

अपात्र शेतकऱ्यांची नावे कापावीत

विशेष म्हणजे, या योजनेंतर्गत अनेक शेतकरी या योजनेचा फसव्या पद्धतीने लाभ घेत आहेत. चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेणाऱ्या अशा शेतकऱ्यांना शोधण्यात सरकार गुंतले आहे. अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळू नये म्हणून सरकारने असे चार फिल्टर बसवले आहेत, जेणेकरुन त्यांना सहज ओळखता येईल.

या राज्यांमधून शेतकऱ्यांची नावे काढून टाकण्यात आली आहेत

पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 58 लाख शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सरकारच्या या पावलानंतर पंजाबमधील 17 लाख शेतकर्‍यांपैकी 15 लाख शेतकर्‍यांची नावे वगळण्यात आली आहेत. आता त्यांची संख्या 2 लाखांवर आली आहे. त्याचवेळी केरळ आणि राजस्थानमधील सुमारे 14 लाख शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! 30 ऑक्टोबरला जमा होणार पीएम किसानचा 24वा हप्ता, पण 'या' 5 चुकांमुळे अडकू शकतात तुमचे 2,000 रुपये

Goa Dairy AGM Adjourned: मराठीत कामकाज नाकारल्याने गोवा डेअरीची सभा गुंडाळली! बेकायदेशीर नोटिशीवरूनही गदारोळ

Drowning Death: मोबोरच्या रिसॉर्टमध्ये दुर्दैवी घटना! किड्स पूलमधून मोठ्या पूलमध्ये गेल्याने 4 वर्षांच्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! आठव्या वेतन आयोगानंतर पगार किती वाढू शकतो? निर्णयापूर्वी 'या' 5 गोष्टी समजून घ्या

वाडे-कुर्डीत दुर्दैवी घटना! पत्नीचा मृत्यू, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमके कारण अद्याप अस्पष्ट

SCROLL FOR NEXT