Farmer  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Scheme: करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता 6000 ऐवजी खात्यात येणार 12000 रुपये!

PM Kisan Scheme Update: केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जात आहेत.

Manish Jadhav

PM Kisan Scheme Update: केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जात आहेत. सरकार देशातील करोडो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देत आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते, मात्र आता राज्य सरकारने देशातील करोडो शेतकऱ्यांना एक खूशखबर दिली आहे. राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 12,000 रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळणार आहेत

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना (Farmers) वार्षिक 12 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नमो किसान महा सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे, ज्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना 50 रुपयांची मदत मिळणार असून त्यातून तुम्हाला दुप्पट म्हणजेच 12 हजार रुपये मिळणार आहेत.

योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या नमो किसान महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना राज्यात लवकरच लागू होणार आहे. महाराष्ट्रातील दीड कोटीहून अधिक शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणार आहे.

6,9000 कोटी रुपये खर्च केले जातील

या योजनेवर 6,9000 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे रहिवासी दाखला, आधारकार्ड, बँक खाते, उत्पन्नाचा दाखला, जमिनीची कागदपत्रे आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

या क्रमांकांवर संपर्क करा

13 व्या हप्त्याचे पैसे अद्याप तुमच्या खात्यात आले नाहीत, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करुनही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT